टाक सराफ, जेजुरी

taksaraf

सुस्वागतम
महाराष्ट्रातील घरा घरां मधील देवघरा मध्ये कुलदैवतांचे टाक पूजले जातात या कुलदैवतांचे शास्त्र शुद्ध टाकांचे निर्मितीचा पारंपारिक वारसा आम्ही परंपरेने पुढे चालवीत आहोत, या निर्मिती बरोबरच भाविकांना त्यांचे विषयी मार्गदर्शन ही आम्ही करीत आहोत, आम्ही निर्माण केलेले टाक आज असंख्य घरा मधुन पुजले जात आहेत. समाजाच्या सर्व स्थरातील लोकांचा यात समावेश आहे, अनेक लोकांना आपल्या कुलदैवतांची माहिती नसते, या माध्यमातून ही माहिती आपणा पर्यंत पोहचविण्याचा हा छोटासा प्रयत्न, कुलदेवतां विषयी व देव घरातील टाकांची रचना तसेच त्यांची देखभाल या विषयी माहिती देणारे या प्रथम स्थळावर आपले स्वागत येथील माहिती आपणास निश्चितच उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो.

देवघरातील कुलदैवतांचे टाक

अनादी काळा पासुन मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रुपात पहात आला आहे व त्याचे विविध रूपातून पुजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पुजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देवून त्याचे मंदिर उभारून पुजा करू लागला अश्या अनेक देव देवता मधील कुलदैवतांचे स्थान त्याचे दृष्टीने महत्वपूर्ण कुळाचे आचाराने देव हे त्या कुळाचे कुलदैवत या कुलदैवताचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत, त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पुजले जातात
कुलदैवतांचे टाक धातू पासुन बनलेले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजुस राळ / लाख लावून मागील बाजुने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोड विरहित असावा असा संकेत आहे. निसर्गाच्या मुळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेताचे आधारे केली जाते. जीवन हे पंचतत्वा पासुन निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतिक म्हणून टाक हा पंचकोनी असतो पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतिक या प्रकाशातूनच जीवन फुलते म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाचा प्रतिमेचा भाग बनवण्या साठी केला जातो त्याच प्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतिक म्हणून शीतलता देणारा तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ट भागा साठी केला जातो.
मुखभाग व पृष्टभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ /लाख या पदार्थाचा उपयोग केला जातो हा उर्जे चे प्रतिक आहे व उर्जा हाच जीवनाचा आधार मानला जातो.
या पद्धतीने निर्माण केलेले कुलदैवतांचे टाक महाराष्ट्रातील प्रत्येक घरात मध्ये दिसतात कुटुंबाचे रोजचे पुजे साठी व नैमेतिक कुलधर्म कुलाचारासाठी कुळातील प्रत्येक देव घरात टाक असलेच पाहिजेत असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे

कुलदैवतांचे टाकांची रचना
महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील देवघरात पुजे मध्ये कुलदैवतांचे टाक असतात, देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी पाच, सात, नऊ, अकरा अश्या वेगवगळ्या संखेत आढळते ती त्या कुलाची कुलदैवते असतात कुलदैवते टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे. देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते, ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवते ही आढळतात, प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी, कुलस्वामिनी, क्षेत्रपाल, ग्रामदेवी, आद्य यक्षपुरुष, इत्यादी दैवतांचा समावेश होतो. कुटुंबाचे कुळाचे मुळ ठिकाण, जात, कुळ, इत्यादी घटकांचा देवघराचे रचनेवर परिणाम होतो, त्या मुळे प्रत्येकाची कुलदैवते बदललेली असतात. खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळ जवळ सर्वच घरा मध्ये दिसतो, भवानी, महालक्ष्मी, रेणुका, इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात, मरीआई, लक्ष्मीआई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, सातीआसरा, अश्या कितीतरी विविध नावानी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळा मधून कुलदैवता मध्ये दिसतात, जोतीबा, रवळनाथ, वीर, बापदेव, अशी अनेक पुरुष दैवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात, तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानी ओळखली जातात, काही परिवारा मध्ये पूर्वज [ पितर] यांची ही स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते, तर काही भागात चेडा, वेताळ, मुंज्या, अशी वेगळ्या वर्गातील दैवतांची स्थापना देवघरात दिसते, एकंदर जात, कुळ, निवासाचा परिसर, मुळ निवास, या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांचे रचनेवर असतो, त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराचे परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते. आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग संख्येत असावे तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे, आपल्या देव घरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजनास निषिद्ध मानले जातात. त्यामुळे या पारंपारिक संकेतांचे दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे. आपल्या पूर्वजांनी दिलेली आपल्या कुलधर्म कुलाचाराची परंपरेची माहिती प्रत्येक परिवारास असतेच असे नाही तेव्हा योग्य ते मार्ग दर्शन गरजेचे असते आपल्या परिसरातील स्थानिक लग्न, पुजा, जोतिष सांगणारे व विविध विधी करणारे पुरोहित, भगत त्याच प्रमाणे सत्संग, केंद्र, बैठक, असे धार्मिक जागृती करणारे यांना या विषयातील परिपूर्ण ज्ञानाचे मर्यादा असतात, त्यामुळे त्यांचे कडून देव घरातील टाकांचे रचने विषयी योग मार्गदर्शन मिळेलच असे नाही म्हणून योग्य अश्या व्यक्ती कडून मार्ग दर्शन घेणे गरजेचे आहे.

देवघरातील टाकांची देखभाल
# देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत , गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील वाहाव्यात, ओला गंध लावू नये.
# दही, दुध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पुजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकट पण पुर्ण जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुवून नंतर टाक वस्त्राने कोरडे करावेत.
# टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याचे पावडर व केमिकलचा उपयोग करू नये.
# सणवार व कुलधर्म कुलाचाराचे वेळास टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच, लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा. अथवा टूथपेष्ट व मऊ टूथब्रश यांचा उपयोग करावा.
# देवघरात लावण्यात येणारा तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवाचे टाकान पासुन दूर लावावा, त्याचा तेलकटपणा टाकान वर चढणार नाही याची दक्षता घ्यावी.
# टाक हाताळताना त्यांचे असलेल्या कोनावर टाक खाली पडणार नाही याची दक्षता घ्यावी. टाक कोनावर खाली पडल्याने त्याचे किनारीची पक्कड सैल होऊ शकते.
# आपण आपल्या देव घरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ चांगले राहतील.

आमच्या विषयी
आम्हाला देव घरातील कुलदेवतांचे टाक विषयीच्या ज्ञानाचा पारंपारिक वारसा लाभला आहे, या मुळे आपली कुलदैवते देव घरातील त्याचे टाक या विषयी सखोल मार्गदर्शन आम्ही परंपरेने करत आलो आहोत, त्याच बरोबर कुलदेवतांचे टाकांची शास्त्र शुद्ध निर्मिती करीत आहोत. आपल्या देवघरासाठी आमच्या कडे विविध आकारातील टाक उपलब्ध आहेत,

उपलब्ध साईज

साईज कोड – 4G
आकार = उंची- ५.५ सेमी रुंदी – ४ सेमी

साईज कोड – 6G
आकार = उंची- ६.५ सेमी रुंदी – ५.२ सेमी

साईज कोड – 10G
आकार = उंची- ७ सेमी रुंदी – ५.५ सेमी

साईज कोड – 15G
आकार = उंची- ९ सेमी रुंदी – ७ सेमी

साईज कोड – 30G
आकार = उंची- १३.५ सेमी रुंदी – १०.५ सेमी

साईज कोड – 50G
आकार = उंची- १८ सेमी रुंदी – १४ सेमी

साईज कोड – 100G
आकार = उंची- २२ सेमी रुंदी – १८ सेमी

आपल्या देवघरातील कुलदेवतांचे टाकासाठी भेट द्या


टाक सराफ
राजवाडा चौक ,महाद्वार मार्ग, जेजुरी.
ता. पुरंदर, जि. पुणे, महाराष्ट्र.
पिन – ४१२३०३
फोन – ९८२२३९४९१५   whatsapp – 9822394915
इमेल –  taksaraf@gmail.com

संपर्क

Comments are closed.