ई - प्रकाशन
खंडोबा विषयक अनेक ग्रंथाचा नाम उल्लेख विविध ठिकाणी आढळतो पण आज ते उपलब्ध होत नाहीत. जुन्याकाळी छपाईची कोणतीच व्यवस्था नव्हती मुळ लेखकाने तयार केलेल्या प्रतीवरून नक्कल करून दुसरी प्रत तयार करणे. अशास पद्धतीने एका वरून दुसरी प्रत तयार करीत ग्रंथांचा प्रसार अनेक शतके होत राहिला. श्रद्धा आणि भक्ती मधून अनेक भक्तांनी हा वारसा संचित करून पुढे चालविला. साक्षरतेचा अभाव ग्रंथावर असणारी विशिष्ट समाजाची मक्तेदारी यात अनेक ग्रंथ दुर्लभ झाले. तर काही यातूनही हि अपना पर्यंत पोहचले. आज माध्यम बदलली आहेत, हे असे ग्रंथ व साहित्य काळानुरूप इ-पुस्तकांचे माध्यमातून खंडोबा भक्तांना उपलब्ध व्हावे म्हणुन चंपाषष्ठी, बुधवार ३० नोव्हेंबर २०११ रोजी इ-पुस्तकांचे प्रकाशनाचा प्रारंभ मार्तंड विजय या ग्रंथाचे रूपाने केला, पुढील काळात उपलब्ध होतील असे खंडोबा विषयीचे प्राचीन लिखाण व खंडोबा विषयी लोककला, जनश्रुतीच्या रूपाने प्रवाही असलेले साहित्य व निर्माण होत असलेले नवसाहित्य या इ-पुस्तकांचे माधमातून आपणा पर्यंत आम्ही प्रयत्न करत आहोत
,————————
इ – पुस्तकाचे नाव — मार्तंड विजय
लेखक – गंगाधर कमलाकर
लिखाण काळ – इस. १८२४
हस्तलिखित प्रतलेखन – भिकोबा विठोबा टाक
प्रतलेखन काळ – इस.१९६६
प्रकाशन – चंपाषष्ठी, बुधवार ३० नोव्हेंबर २०११
—————————
इ – पुस्तकाचे नाव — मल्हारी माहात्म्य
लेखक – सिद्धपाल केसरी
लिखाण काळ – इ.स. १५८५
प्रकाशन – पौष पौर्णिमा, सोमवार ९ जानेवारी २०१२
Download
—————————
इ – पुस्तकाचे नाव — मल्हार विजय
सचित्र मल्हारी आवतार कथासार
लेखक, चित्रांकन – गणेश टाक
प्रकाशन – गुरुवार, २६ जानेवारी २०१७
Download
—————————
इ – पुस्तकाचे नाव — जेजुरी दर्शन
लेखक – गणेश टाक
आवृत्ती – प्रथम
प्रकाशन – चैत्र पौर्णिमा, बुधवार ८ एप्रिल २०२०
Download
—————————
इ – पुस्तकाचे नाव — भुपाळी खंडोबाची
आवृत्ती – प्रथम
प्रकाशन – चैत्र पौर्णिमा, बुधवार ८ एप्रिल २०२०
Download
—————————
इ – पुस्तकाचे नाव — श्री मल्हारी माहात्म्य
( संस्कृत )
लिखाणकाळ इस. १२६० ते १३९८
लेखक – अज्ञात
प्रकाशन – चैत्र पौर्णिमा, बुधवार ८ एप्रिल २०२०
Download
—————————
इ – पुस्तकाचे नाव — मल्हारी माहात्म्य
लेखक – श्रीधर स्वामी नाझरेकर
[इस.१६५८ ते १७३०]
आवृत्ती – द्वितीय
प्रकाशन – चैत्र पौर्णिमा, बुधवार ८ एप्रिल २०२०
Download
—————————