मल्हारवारी

मल्हारवारी

जयमल्हार !
खंडोबा भक्त, उपासक, अभ्यासक व पर्यटक अश्या खंडोबा विषयी व जेजुरी विषयी माहितीची आस असणाऱ्या आपणा सर्वांचे या संकेत स्थळावर मन:पूर्वक स्वागत आपल्या सर्वांची खंडोबा विषयक माहितीची व ज्ञानाची भुक शमविण्याचा छोटासा प्रयत्न या संकेत स्थळाचे माध्यमातून केला आहे तो आपणास आवडला असेलच.
जेजुरी माझी जन्मभुमी आणि कर्मभुमी या जेजुरीच्या मातीत, चराचरात खंडोबा आणि त्याची भक्ती सामावली आहे, प्रत्येक सण उत्सव, यात्रा, शुभकार्य, खंडोबा मय, अडीअडचणीला प्रथम त्याचीच आठवण येते. या पांढरीचा इतिहास, कला, संस्कृती, सर्वच खंडोबा भोवती फिरणारे, खंडोबा अवतार, जेजुरीगड, कडेपठार, येथील देवदेवता, मंदिरे, याच्या विषयी सांगितल्या जाणाऱ्या विविध कथा, दंतकथा माझ्या लहानपणा पासूनच माझे कुतुहूल जागवित होत्या, माझे वडील कै. भिकोबा टाक यांचा देवाचे टाक बनविण्याचा पारंपारिक व्यवसाय होता. त्यामुळे खंडोबा त्याचे रूप त्याची पुजा प्रतीके यांचा लहानपणा पासुन परिचय होत होता. जेजुरीत चालणाऱ्या उत्सव विविध कुलधर्म कुलाचार लहानपणा पासुन पहात होतो . त्यातून या सर्वा विषयी उत्स्तुक्ता वाढत होती. वडिलान कडे व्यवसायाचे निमित्याने येणाऱ्या विविध खंडोबा भक्तांचे चर्चे मधुन खंडोबाची समाजमनातील विविध रूपे समजायची, सांगली परिसरातील एक वाघोबा यायचा त्याने आपली स्वताची मांडी चिरून त्यामध्ये खंडोबाची पेटी ठेवली होती, हे सगळे अदभुत वाटायचे. माझ्या वडिलांना वाचनाचा व्यासंग होता व खंडोबा विषयीची श्रद्धा यातून त्यांनी सिद्धपाल केसरी लिखित ‘ मल्हारी महात्म्य’ व गंगाधर लिखित ‘ मार्तंड विजय’ या या दोन्ही ग्रंथांची स्व:हस्ताक्षरात हस्त लिखिते तयार केली होती, गावातील काही भक्त हे ग्रंथ पारायणा साठी घेऊन जात, तर कधी ते स्वतः घरी पारायण करीत. खंडोबा विषयी अभ्यास करणारे जर्मन अभ्यासक गुंथर सोन्थ्यामर कधी कधी त्यांचे कडे येत असत, हस्तलिखित ग्रंथांचे व खंडोबा चे टाकाचे ठशांचे फोटो ते काढून नेत, त्यातील काही फोटो त्यांनी आपल्या शोध ग्रंथात वापरले आहेत. एक परदेशी माणूस खंडोबा विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो याचे आश्चर्य वाटायचे, सभोवतालच्या या वातावरणाचा परिणाम म्हणून खंडोबा विषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा वाढत गेली
पुढे काळाचे ओघात लहानपणी कुतूहल आणि जिज्ञासा वाटणाऱ्या खंडोबा विषयाने अभ्यासाची जागा घेतली. खंडोबा त्यांचे चरित्र, उपासना, परंपरा त्यांच्या मागच्या भुमिका अधिक समजून घेण्याचा प्रयत्न ‘मल्हारी महात्म्य’ ‘मार्तंड विजय’ अश्या ग्रंथांच्या माध्यमातून सुरु झाला. खंडोबा विषयक ग्रंथ, पुस्तके यांचा धांडोळा घेतला काही पुस्तके संधर्भ काळाच्या ओघात दुर्मिळ ही झाली होती विविध खंडोबा क्षेत्रांच्या भेटी. खंडोबाचे उपासक, भक्त यांच्याशी संवाद साधु लागलो. यातून काही संधर्भ घेऊन पुन्हा शोध त्याची पडताळणी . या माध्यमातून काम सुरु झाले. प्रत्येक वेळी नवीन दिशा आणि साधनेही मिळत गेली तर कधी निराशाही अनुभवली, दुर्मिळ झालेली संधर्भ पुस्तके मिळविण्याचे प्रयत्नही केले कधी यश तर कधी अपयश. उपासकांची पदे, लोकगीते, दंत कथा, यामधून खंडोबाचे लोकमनातील स्थान, त्याच्या उपासना पद्धती उलगडत गेल्या, महाराष्ट्रात खंडोबा नावाने परिचित असणारा हा लोक देव कर्नाटकात मैलार, तर आंध्र प्रदेशात मल्लाना या नावाने परिचित आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील परंपरांचा मागोवा घेण्यासाठी अनेकदा या प्रदेशातील प्रमुख खंडोबा, मैलार, मल्लाना क्षेत्रांना भेटी दिल्या. या तून तेथील परंपरा लोककथा, मंदिरावरील शिलालेख विविध संधर्भ साधने, या तून क्षेत्रांचा परिचय होत गेला, या भेटीत या ठिकाणांचे छायांकन व काही ठिकाणांचे चित्रीकरण ही केले. सुमारे १४ वर्ष खंडोबाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न सुरु आहे व सुरु राहील. आजवरच्या प्रयत्नात जसे काही नवीन सापडल्याचा आनंद मिळाला, तसाच आपल्या कडे जे आहे ते नष्ट झाले तरी चालेल पण समाजाला ते मिळू नये या प्रवृतीचा ही अनुभव आला. याच मानसिकतेतून ‘ जयाद्री महात्म्य’ ‘ मैराळ तंत्र’ सारखे ग्रंथ काळाचे उदरात गडप झाले आहेत, खंडोबा विषयी भक्तांचे मनात नितांत श्रद्धा असली तरी खंडोबा अवतार, त्याच्या धार्मिक परंपरा, सर्वांनाच माहिती असतात असे आहे. अगदी खंडोबाचे एखाद्या मंदिरातील पुजार्यालाही खंडोबा विषयीचे प्रचलित ग्रंथ व त्यामधील खंडोबा अवताराची कथा सांगता येत नाही असे अनुभव ही या भटकंतीत आले. खंडोबा विषयीचा अभ्यास हा कधीच संपणारा नाही. आज पर्यंत उपलब्ध असणारे हे भांडार सर्वाना खुले व्हावे व ते नेहमी अद्यावत करता यावे, व सर्वदूर पोहचावे. या हेतूने काळाचे ओघात धावणाऱ्या या संकेत स्थळाचे माध्यमातून अपना पर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न, माध्यमाचे मर्यादेतून कमीत कमी लिखाणातून जास्तीत जास्त व अचूक माहिती मिळावी व यांचा भक्त, अभ्यासक, उपासक या सर्वांनाच उपयोग व्हावा या पद्धतीने या संकेत स्थळाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
खंडोबा विषयी अभ्यास करताना जेजुरी परिसरातील मंदिरे, जेजुरीतील यात्रा उत्सव यांचे चित्रीकरण , जेजुरीची ऐतिहासिक, सांस्कृतिक, भूगोल, पर्यावरण, या वरही काम केले होते. या सर्वांचा समावेश या संकेत स्थळावर आहे. हे संकेत स्थळ अधिक समृद्ध करण्याचा नेहमीच प्रयत्न राहील
खंडोबा विषयीच्या या आजवरच्या प्रवासात अनेक ज्ञात आज्ञात सहकार्यांनी साथ दिली त्या सर्वाना धन्यवाद
ह्या संकेत स्थळाने सर्व खंडोबा भक्त, अभ्यासक, उपासक, यांचा आनंद वर्धित व्हावा व ते अधिक समृद्ध करण्यासाठी प्रेरणा मिळावी. सर्वांच्या मनोकामना पुर्ण व्हाव्यात, मल्हारीचे आशीर्वाद सदैव पाठीशी असावेत ह्याच मोत्यांची वारी या संकेत स्थळाचे रूपाने मी मल्हारीकडे मागत आहे. माझी ही वारी मल्हारीने भरभरून द्यावी हीच त्याचे चरणी प्रार्थना
येळकोट येळकोट जय मल्हार !!!!!!!!!!!!!
आपला
गणेश टाक
अध्यक्ष – श्री मार्तंड अध्यासन
(खंडोबा विषयक अभ्यास व प्रसार मंच )
चैत्र शुद्ध प्रतिपदा [ गुडी पाडवा ] शके १९३२
मंगळवार दि. १६ मार्च २०१०

—————————–
© निर्मिती, संकल्पना, लेखन, व्यवस्थापन

ganesh tak

 

 

 

 

 

गणेश टाक
——————————-

प्रेरणा स्थान

tak (Copy)

 

 

 

 

 

 

कै. भिकोबा विठोबा टाक  कै. हिराबाई भिकोबा टाक

—————————–

संपर्क

गणेश टाक
‘टाक सराफ’
महाद्वार मार्ग, जेजुरी
ता. पुरंदर; जि. पुणे
४१२३०३

—————–
सहकार्य

राजकुमार पवार, विजयकुमार हरिश्चंद्रे, सचिन झगडे, रियाज पानसरे, राहुल मंगवानी, दत्तात्रय कदम, कैलास शिर्के, विलास कड, रामदास राउत, स उपाध्ये, धनंजय आगलावे, विठ्ठल ठोंबरे, महेश जेजुरीकर, समीर गेजगे, दत्तात्रय गोसावी, सुनील देवणे, विक्रम पवार, पाब्लो होलवेट, सदानंद बारभाई, दादा असवलीकर, अमोल बेलसरे, चंद्रशेखर सेवेकरी, घनश्याम मोरे, प्रियांका मोरे, कोमल हिंगणे, गिरीश आगलावे, अतुल आगलावे, अयुब खान, एम मल्लिकार्जुन, नागमल्लाना, सुभाष पुजारी, वडियार स्वामी, बबन शेडगे, छगन गोरे, राम गोरे,  शेखरबाबु पंडील्ला, के. शेषु भारती, डि. सदनंदम, एम.गणेश, माद्वकर, मल्लू वच्चाल, खंडाप्पा पुजारी, सतीश यादव, विशाल जावळकर

ध्यानमंत्र – स्वर, संगीत – हर्षित अभिराज
————————–

आभार

या संकेत स्थळावर समाविष्ट सर्व मंदिरांचे विश्वस्त मंडळ, व्यवस्थापन समिती, त्या गावचे स्थानिक स्वराज संस्था, ग्रामस्थ, संकेत स्थळ निर्मितीत विविध माध्यमातून ज्या सर्वांचा सहयोग लाभला त्या सर्वांचे विनम्र आभार.


Comments are closed.