महाराष्ट्र विविध दैवते

 

महाराष्ट्रातील अष्टविनायक, आदिशक्तीची साडेतीन पीठे व विविध देवी दैवतांचा मंदिरे, आरती, मंत्र, श्लोक या सह सचित्र परिचय.

महाराष्ट्र गणेश मंदिरे

गणेश रूपे

अष्टविनायक

मोरगाव  सिद्धटेक  थेऊर  रांजणगाव  ओझर  लेण्याद्री  महड  पाली  

गणेश आरती मंत्र

महाराष्ट्र देवी मंदिरे

साडेतीन शक्तीपीठे

तुळजापूर  कोल्हापूर  माहूरगड  सप्तश्रुंगी  

कार्ला  औंध करमाळा  अंबेजोगाई  जीवदानी  येरमाळा  मोहटादेवी 

देवी आरती मंत्र

*

महाराष्ट्र गणेश मंदिरे

 

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
गणपती भारतीय संस्कृती मधील विघ्न निवारक देव आहे. विघ्नांचा नाश करून मांगल्याची स्थापना करणारा देव म्हणून गणेशाला आज आसेतु हिमालय मान्यता आहे. पितृ कार्य सोडून इतर सर्व कार्या प्रारंभी त्याचे स्मरण केले जाते.”कार्याचा श्रीगणेशा” म्हणजेच कार्याची सुरवात असा अर्थ मानला जाते. प्रत्येक घरे, वाडे, मंदिरे याच्या मुख्य दरवाज्यावर गणेशाचे शिल्प काढले जाते याला गणेश पट्टी असे म्हणतात. असा हा सर्व व्यापुन राहिलेला गणेश. प्रचलित असणारी गणेशाची लोक प्रियता पाचव्या शतका पुढील दिसते. या शतका पूर्वीच्या त्याच्या मुर्ती सापडलेल्या नाहीत.सनातनी पंडितांच्या मते गणपती ही संर्पूणत: वैदिक देवता आहे. त्यांचे मतानुसार ऋग्वेदातले ब्रह्मणस्पतिसूक्त हेही गणपतीचेच सूक्त आहे. परंतु अभ्यासकांचे मते हे मंत्र देवगणांचा पती ब्रहस्पती यांचा आहे, गणपतीचे स्पष्ट उल्लेख अतिप्राचीन वाङमयात सापडत नाहीत, गणपतीचा स्पष्ट उल्लेख मैत्रायणी संहितेतील गणेश गायत्री मध्ये मिळतो यांचा अर्थ साहित्यात गणपतीचा जन्म इसवीसनाचे सुरवातीचे खुप अगोदर झाला होता. पण त्याचे मुर्ती स्थापना पाचव्या शतका पर्यंत दिसत नाही. आजच्या गणपतीची आठवण करून देणाऱ्या सगळ्यात जुन्या प्रतिमा म्हणजे हत्तीचे तोंड असलेल्या मानवाकृती प्रतिमा शुंग-कुशाण कला पासुन मथुरा व अमरावती येथे मिळाल्या आहेत काही विद्वान यांना गजमुख यक्ष मानतात. गणेशाचे रुपाकडे लक्ष दिल्यास त्याचे ठेगना बांधा, आखूड मांड्या, सुटलेले पोट,यांचा संबंध यक्ष प्रतिमांशी आहे, अश्या गजमुख यक्ष प्रतिमा मध्ये गणेश मुर्तीचे मुळ असल्याचे सिद्धांत डॉ कुमारस्वामी यांनी मांडला होता. पुराणात गणेशाचा उल्लेख वक्रतुंड असा केलेला आहे. तर महानिर्वाण तंत्रात त्याचा उल्लेख रक्ततुंड असा केलेला आहे, वैदिक देवता मध्ये समावेश नसला तरी त्याचे पुजन ग्रामदेवताचे रूपाने त्या काळी होत असावे. गणेश ही प्रथम आर्येतरांची एक ग्रामदेवता होती. कदाचित तिचे पूजक तिच्यापुढे नरबळी देऊन रक्ताचा तिच्यावर अभिषेकही करीत असावेत. यामुळेच त्याचा उल्लेख रक्ततुंड असा केलेला असावा, आजही गणपतीला सिंदूरचर्चन केले जाते. आर्येतर लोक हत्तीची पूजा करीत होते व त्या पूजेतूनच गणेशपूजा विकास पावली असे काही अभ्यासकांना वाटते. गणपती मूळची आर्येतर देवता असल्याबद्दल अनेक संशोधकांचे एकमत आहे. मुलत अनार्य हे सुर्य पुजक त्यांचे दृष्टीने गणेश हे सूर्याचे व त्याचे वाहन उंदीर हे अंधाराचे प्रतिक होय. विघ्न निर्माण करणारा विनायक, विघ्नकृत, विघ्नेश, विघ्नराज, ही गणपतीची नावे पाहता सुरवातीला विघ्न निर्माण करणारी देवता म्हणून त्याची मान्यता असावी, कार्य निर्विघ्न पडावे यासाठी त्याचे आध्य पुजन सुरु झाले त्याचे विघ्नकर्ता हे रूप पुढे लोप पावले व तो विघ्न विनाशक म्हणून मान्यता पावला. विघ्नकर्ता विनायक विघ्नहर्ता, सिद्धीदाता झाला. काळाचे ओघात त्याचे महत्व वाढू लागले. सुरवातीला गणपतीची गणना शिवगणात होऊ लागली. तो शिवगणांचा सेनापती झाला. पुढे त्याच्या भक्तांनी त्याला शिव पार्वतीचा पुत्र मानले. पुराणात त्याचे संबंधी नवीन आख्याने येवू लागली मध्यकाळाचे शेवटी गणेश पुराण, मुद्गल पुराण, या सारखी संपूर्ण पुराणे लिहिली गेली. व गणपती उपासकांचा गाणपत्य हा स्वतंत्र संप्रदाय झाला. व योग व तंत्र शास्रात गणपतीचा समावेश झाला. गणपती व शंकराचे नाते जुन्या काळा पासुन मानले जाते. शिव आणि गणपती हे पिता पुत्र होत हे सर्व पुराणांना मान्य आहे, पण त्याचे जन्म कथेत मात्र बरीच भिन्नता आहे. विविध आख्यान मधुन गणपतीच्या विविध जन्म कथांनी जन्म घेतला.
गणपतीच्या विविध जन्म कथा
एकदा पार्वती स्नान करत होती, तेव्हा तिच्या अंगावरच्या मळापासून तिने गणपती बनविले आणि प्रवेशद्वारावर उभे करून त्याला सांगितलं कि कुणालाही महालात प्रवेश करायची अनुमती देऊ नकोस. नंतर ती स्नान करायला महालात निघून गेली, थोड्याच वेळाने भगवान शंकर आले, त्यांना आत प्रवेश करायचा होता परंतु बाळ गणेश त्यांना आत जाऊ देईना, तेव्हा शंकरांनी गणपतीचे मुख धडावेगळे केले कारण त्यांना माहित नव्हता कि हा आपलच मुलगा आहे , जेव्हा हि बातमी पार्वतीला माहित पडली तेव्हा ती क्रोधीत आणि दुखी झाली. तेव्हा शिव नि तिचे सांत्वन केले आणि आपल्या गणाना आदेश दिला, कि तुम्ही पृथ्वीतलावर जा आणि जो कुणी प्राणी तुम्हाला सर्वात पहिले उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या अवस्थेत सापडेल, त्याचे शीर घेऊन या, तेव्हा गणाना हत्ती सापडला. तेव्हा देवांनी हत्तीचे ते शीर गणपतीला जोडले, व गणपती गजमुख झाला.
शिव पुराणातील ही कथा वामन पुराण व मत्स्य पुराणास मान्य आहे. तरीही इतर काही कथा आहेत.
गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र असला तरी तो अयोनिज आहे. गणपती हा केवळ शिवाचा पुत्र होय. शंकरांनी आपल्या तप:सामर्ध्याने एक महा तेजस्वी बालक निर्माण केला. या बालकाला पार्वतीने पाहिले. अशा सुंदर पुत्राला आपल्या साहचर्यावाचून एकट्या शिवानेच जन्म द्यावा, यांचा तिला राग आला व तिने त्या बालकाला शाप देऊन गजमुख बनविले. पार्वतीला मुलगा झाला तेव्हा सर्व देव त्याला पाहण्यास आले. शनि आला नाही पार्वतीचे आग्रहाने तो आला पण गजाननाकडे न पाहता खाली मान घालून बसला. पण पार्वतीने शनीला गणपतीकडे पाहण्यास सांगितले.शनीने त्याच्यावर दृष्टी टाकताच. गणपतीचे मस्तक गळून पडले. तेव्हा पार्वती शोकाकुल होऊन ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाने तिला सांगितले की तुला सर्वात प्रथम ज्या प्राण्याचे मस्तक आढलेल, ते तू गणपतीच्या देहाला लाव, म्हणजे तो सजीव होईल. त्यानुसार पार्वती मस्तक शोधू लागली तेव्हा पथम तिला गजाचे मस्तक मिळाले. ते आणून तिने गणपतीच्या देहाला लावले. व गणपती गजमुख झाला.
सिंदुरासूर नावाचे राक्षसाचा वध करण्यासाठी विष्णूने पार्वतीचे पोटी जन्म घेण्याचे ठरविले. सिंदुरासुरास हे समजले त्याने गर्भात असलेल्या बालकाचे गर्भात शिरून शीर तोडले, पुढे मस्तक हीन मुल जन्माला आले. पण ते जिवंत होते. शंकरांनी हत्तीचे शीर तोडून त्याला लावले व पुढे हा गजानन झाला व त्याने सिंदुरासुराचा वध केला.
शिव पार्वती हिमालयात विहार करीत होते. तिथे एक हत्तीचे जोडपे रतिक्रिडा करताना त्यांना दिसले. मग शिव-पार्वतींनीही गजरूप घेऊन रतिक्रिडा केली आणि त्या क्रीडेतून त्यांना गणपती हा गजमुख पुत्र प्राप्त झाला जनात पापकार्ये निर्विघ्न होवू लागली मुळे देव चिंतीत झाले व ते रुद्र कडे गेले. रुद्र पार्वतीकडे पाहून हसले व तेथे आकाश तत्वाचा प्रतिनिधी म्हणून एक पुरुष प्रगट झाला.पार्वती त्याला पाहू लागली तेव्हा क्रोधीत रुद्राने त्याला तु हत्ती तोंडाचा होशील असा शाप दिला. या वेळी अनेक विनायकांची उत्पती झाली. ब्रह्मदेवांचे मध्यस्तीने शंकरांनी त्याला विनायकांचा अधिपती केले.
अश्या विविध जन्म कथा असणारा गणेश विविध कलागुणांचा व विद्येचा अधिपती मानला जातो ऋग्वेदापासून तमाशाच्या फडावरही गणेशाची वंदना केली जाते. नृत्य, नाट्य सर्वत्र त्याचा जयजयकार झालेला आहे, देवनागरी लिपीचा त्याला जनक मानला जातो.
*
गणपतीची चार युगांची रूपे गणेश पुराणात वर्णन केली आहेत.
१) कृतयुगात गणेशाचे नाव ‘विनायक’ असुन तो दशभुजा व सिंहारूढ आहे
२) त्रेतायुगात गणेशाचे नाव ‘मयुरेश्‍वर’ असून, तो सहा भुजांचा मोरावर बसलेला आहे.
३) द्वापारयुगात गणेशाचे नाव ‘गजानन’ चतुर्भुज असून, उंदीर त्याचे वाहन आहे.
४) कलियुगात गणेशाचे नाव ‘धूम्रकेतू’ द्विभुज असून, घोडा त्याचे वाहन आहे.
याच पुराणात गणपतीच्या ५६ रूपांचा उल्लेख असुन यातील काही चार, सहा, दहा हातांची असुन सिह मोर, उंदीर ही त्यांची वाहने आहेत हेच ५६ विनायक म्हणून ओळखले जातात. स्कंद पुराणात काशीखंड मध्ये वानर, सिह,व हत्ती अश्या त्रिमुख गजाननाचा उल्लेख आहे, महेश्वर खंडात गणेश मुर्तीचे तीन प्रकारात विभाजन केले आहे.
.
१) सात्विक – पाच तोंडे दहा हात असलेला.
२) राजस – चार हात व सोनेरी रंग असलेला.
३) तामस – निळ्या रंगाचा
या शिवाय तंत्रात त्याची विविध ध्याने वर्णन केली आहेत, शिल्पांचे आधारे त्याचे पुढील प्रकार दिसतात.
१) नृत्य गणेश : नृत्याने गणेशाने शिव-पार्वतीला प्रसन्न करून डोक्‍यावरील डोक्‍यावर चंद्र व इतर आभूषणे व सर्व गणांचे आधिपत्य मिळविले होते. त्रिभंग मुद्रा, तोल, लय हे याचे वैशिष्ट्य. पायात घुंगरू व हातात वाद्येही असतात. व शेजारी वाद्ये घेतलेले साठी ही दिसतात.
२) शक्ती गणेश : थोड्याच प्रमाणात या मूर्ती आहेत. यात आपल्या शक्तीला गणेश आलिंगन मुद्रेत मांडीवर घेऊन बसलेला दिसतो.
३) पंचविनायक पट्ट स्कंदपुराणातील गजविनायकाचे हे रूप ओळीने पाच गणपती शिलापट्टीवर आहेत.
४) महागणपती किवा पंचमुख गणेश : पाच सोंडा व दहा हात, हे महागणपतीचे लक्षण. चार बाजूंची गजमुखे व त्यावर अजून एक मुख, हे ढोबळ रूप. गणपती जवळ सिह, उंदीर, मुंगुस हे प्राणी दिसतात.
५) यक्षविनायक : पाच मुखे, दहा कान ,पाच दात एकदंत, मधल्या सोंडेच्या दातावर तीन बारीक हत्ती कोरलेले आहेत. चार हात मधील दोन मांडीवर व मागील हातात अंकुश व सर्प आहेत.
६) राक्षसारूढ गणपती : पंचशुण्डा (सोंड), दशभुजा (बाहू- हात) गणपतीचाच हा प्रकार असून, गणपतीच्या हातात निलोत्पल, परशु,खड्ग,शंख,फल. बाण, पाश या वस्तू आहेत. तो द्विमुखी राक्षसाच्या खांद्यावर बसला आहे. राक्षसाची तोंडे पशूची असुन त्याला आठ हात आहेत,दिल्लीच्या विमल सेठ यांच्या संग्रहात हे दुर्मिळ काष्ठशिल्प आहे.
७) हेरंब गणपती : हा गणपती सिहावर बसलेला असुन याला पाच सोंडा आणि दहा हात आहेत,दोन हात अभय मुद्रेत असुन बाकी हातात माळा, परशु, दात, पाश, मोदक आहेत.. मुशीगंज (बांगलादेश) येथे तो मिळाला आहे.
देशाचे कानाकोपर्यात व देश विदेशात ही गणपतची अनेक स्थाने आढळतात परंतु पुराणा मध्ये गणेशाची प्रमुख २१ स्थाने वर्णन केलेली आहेत, पुराण प्रसिद्ध अष्टविनायक भारताच्या आठ दिशांना आहेत.पूर्वादी दिशा क्रमाने त्यांची नावे
१) वक्रतुंड, २) एकदंत, ३) महोदर, ४) गजानन, ५) लंबोदर, ६) विकट, ७) विघ्नराज, ८) धूम्रवर्ण,
अशी आहेत.
पुराण प्रसिद्ध २१ स्थाना मधील १२ गणेश क्षेत्रे महाराष्ट्रात आहेत,
१)मोरगाव, २) कळंब, ३) आदासा, ४) गंगामसले, ५) राक्षसभुवन, ६) सिद्धटेक, ७) रांजणगाव, ८) लेण्याद्री, ९) वेरूळ, १०) पद्माळे, ११) नामलगाव, १२) राजूर

ही ती स्थाने होत,
लोकमताचे परंपरेने
*
१) श्रीमयूरेश्‍वर- मोरगाव,
२) सिद्धिविनायक, सिद्धटेक
३) चिंतामणी, थेऊर
४) महागणपती, रांजणगाव
५) विघ्नेश्वर, ओझर
६) गिरिजात्मज, लेण्याद्री
७) वरद विनायक, महड
८) बल्लाळेश्‍वर, पाली
हे अष्ट विनायक मानले जातात, या विनायकांचा व महाराष्ट्रातील जागत्या गणेश स्थानाचा हा सचित्र परिचय

अष्ट विनायक दर्शन

Ashtavinayak Route Map
*
१) श्रीमयूरेश्‍वर- मोरगाव, ( ता. बारामती जि. पुणे,)

morgoan
मोरगांव पुणे जिल्हयातील बारामती तालुक्यातील हे श्री मोरेश्वर गणेशाचे स्वयंभू व आद्यस्थान अष्टविनायकात प्रमुख आद्यपीठ मानले जाते. मोरगांवचे मुळनांव “भुस्वानंदभुवन” असे होते असे म्हणतात . मोरावर स्वार झालेला गणपती तो मयुरेश्वर त्या मयूरेश्वराचे स्थान असलेले गाव म्हणुन याला मोरगांव असे नांव पडले आहे. काही मतानुसार या गावात पुर्वी खुप मोर होते म्हणुन याला मोरगांव असे नांव पडले आहे असे मानतात. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. मोरगांव कर्‍हा नदी काठी वसलेले आहे.
येथील मयुरेश्वराचे मंदिर गावाच्या मध्यभागी चोथार्यावर असून मंदिराला सभोवती कोट आहे, मंदिराचे प्राकाराचे समोर नगारखाना असून या नगारखान्या खाली हातात लाडू घेतलेली उंदीराची मोठी दगडी मूर्ती आहे. पुढील पायर्या चढल्यावर मंदिराचे प्राकाराचे दगडी चोथर्यावर मोठा नंदी आहे. या पुढे मंदिराचे प्राकाराचे प्रवेशद्वार लागते. मुख्यमंदिराची रचना सभामंडप, मुखमंडप,गर्भगृह अशी आहे. या मंदिराचा जीर्नोधार पेशवे काळात झाला आहे. गर्भगृहात शेंदूरचर्चित मयुरेश्वराची मूर्ती आहे, चतुर्भुज बैठ्या मूर्तीचे हातातील आयुधे स्पष्ट होत नाहीत. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मुद्गल पुराणात श्रींची मुर्ती चतुर्भुज व त्रिनेत्र असून वरच्या दोन हातात पाश व अंकुश धारण केले आहे. खालच्या दोन हातापैकी एक उजव्या गुडघ्यावर ठेवलेला असून डाव्या हातात मोदक धारण केलेला आहे. असे वर्णन केलेले आहे. या मुर्ती संबधी काही दंतकथा असून सृष्टीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा निर्मिती नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश, सुर्य, शक्ती यांना सृष्टीचा खरा निर्माता कोण असा प्रश्न पडला त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना एक दिव्या ज्योत दिसली, या ज्योतीत त्यांना मयूरेश्वराची प्रतिमा दिसली व त्यांनी या ठिकाणी तिची स्थापना केली ,आज दिसणारी मुर्ती आहे ती मुळ मुर्ती नसून श्रींची मुळ मुर्ती मृत्तिका, लोह व रत्न याच्या पासून बनविलेली होती ती या मुर्तीच्या मागे अदृष्य आहे. त्या मूर्तीची स्थापना पंचदेवांनी केली होती सिंधुरासुराने तीचा विध्वसं केला त्यानतर ब्रम्हदेवाने दोन वेळा या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. पुढे काही काळानंतर पांडव तीर्थयात्रेनिमीत्त येथे आले असता मुळ मुर्तीला कोणी धक्का लावू नये म्हणून त्यांनी तीला बंदिस्त केले व या मूर्तीची स्थापना केली.
मंदिराचे प्रदिक्षणा मार्गावर नग्नभैरव व गणेशाचे विविध रूपातील प्रतिमा आहेत, मंदिराचे समोरील कर्‍हा नदी काठावर एक शिव मंदिर आहे
गणेश भक्त मोरया गोसावी यांचे हे जन्मस्थान. मोरया गोसावी हे मोरेश्वराचे निस्सीम भक्त होते. याचा जन्म मयूरेश्वराचे कृपा प्रसादाने झाल्याचे मानले जाते. या ठिकाणी त्यांनी तप केले, त्यांना येथिल कर्‍हा नदीत एक गणेश मुर्ती सापडली या मुर्तीची त्यांनी चिंचवडला स्थापना केली. मोरया गांसावी दर शुध्द चतुर्थीला मोरगांवला यात्रेला जात असत. आजही माघी शुध्द चतुर्थी व भाद्रपद शुध्द चतुर्थी या दिवशी चिंचवडहून मोरगांवला गणेश देवांची पालखी जाते.
सर्वत्र प्रचलित असणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हे पाच दिवस व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हे पाच दिवस हे दहा दिवस येथे यात्रा असते, या दिवशी गर्भगृहात सर्वाना मुक्त प्रवेश असतो, सोमवती अमावास्या व दसरा या दिवशी पारंपारिक सोहळा असतो.
*

२) सिद्धिविनायक, सिद्धटेक (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर,)

sidhatek
महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यात सिध्दटेक या गांवी सिध्दीविनायक हे अस्ताविनायाकातील स्थान मानले जाते. सिध्दटेक हे गांव भिमा नदीच्या काठावर बसलेले आहे. या मंदिराचे बांधकाम पेशवे कालीन आहे. हे मंदिर उत्तर भिमुख असुन मंदिराचे वेशी पासून देवाला पर्यंत फरासबंदीचा मार्ग सरदार फडके यांनी बांधला आहे. मुख्य महाद्वारातून मंडपात जाता येते. हा मंडप श्रीमंत मैराळ यांनी बांधला आहे, मंदिराचे गर्भगृह होळकरांनी बांधले आहे. गर्भगृहात सिद्धीविनायकाची स्वयंभू उजवीकडे झुकलेली सोंड असलेली शेंदूर चर्चित मूर्ती आहे या सिद्धीविनायका विषयी काही कथा प्रचलित आहेत प्राचीन काळी श्री गणेशाच्या कृपेने ब्रम्हदेवाला सृष्टीची निर्मीती करण्याची प्रेरण लाभली व ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण्‍ा करण्यास प्रारंभ केला. ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करण्यात मग्न होवून गेले असतांना श्री विष्णु क्षीरसागरात निद्रा अवस्थेत असतांना त्यांच्या कानातुन दोन राक्षस जन्मास आले. त्यांची नांवे मधु व कैटभ असे होते. त्यांनी ब्रम्हदेवास त्रास देवून त्यांचे सृष्टी निर्माणचे कार्य बंद पाडले. त्याने सारी सृष्टी भयभीत झाली. मग ब्रम्हदेवाने प्रार्थना करुन विष्णुदेवाला जागे केले. श्री विष्णु जागे होताच ब्रम्हदेवाने त्यांना मधु आणि कैटभ याची माहिती दिली. भगवान विष्णुव मधु-कैटभ यांचे घनघोर युध्द सुरु झाले. पण विष्णुंना त्या राक्षसांचा पराभव करता आला नाही. म्हणुन ते शंकराकडे गेले. श्री शंकरांनी श्री विष्णुंना सांगीतले की युध्दास प्रारंभ करण्यापुर्वी श्री गणेशाचे पुजन केले नाही त्यामुळे तुला अपयश आले. तेव्हा श्री शंकराने श्री विष्णुंना षडाक्षरी मंत्र सांगुन त्यांना गणेशाची उपासना करण्यास सांगीतले.
तेव्हा विष्णु येथील एका आले तेथे त्यांनी “श्री गणेशाय नम:” या षडाक्षरी मंत्राने श्री गजाननाची आराधना केली व तपश्चर्याने श्री गणेश प्रसन्न झाले. व विष्णुंना सिध्दी प्राप्त झाली व त्यांनी मधु-कैटभ ह्या दोन राक्षसांना ठार केले. ज्या ठिकाणी विष्णुंना सिध्दी प्राप्त झाली व श्री गणेश प्रसन्न झाले त्या ठिकाणी विष्णुंनी गंडकी शिळे सिद्धीविनायकाची मुर्ती स्थापना केली. सिद्धी प्राप्त झालेले ठिकाण म्हणुन या ठिकाणाला सिध्दटेक व सिद्धी देणाऱ्या या गणेशाला सिध्दीविनायक नाव प्राप्त झाले. भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी व माघ शुध्द प्रतिपदा ते पंचमी हे दोन मोठे उत्सव साजरे केले जातात.
*

३) चिंतामणी, थेऊर (ता. हवेली, जि. पुणे,)

theuar
महाराष्ट्रात पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यात अष्टविनायकातील हे स्थान थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. या मंदिराचे मुख प्रवेशद्वार उत्तरेला असुन मंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे, मंदिरावर ३० फुट उंचीचे शिखर आहे. या मंदिराची उभारणी धरणीधर महाराज यांनी एस १७४० मध्ये केली, मंदिरापुढील मंडप सरदार फडके यांनी बांधला, चिंतामणीची मूर्ती बैठी असुन डाव्या सोंडेची आहे, बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. मूर्तीचे डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत
या स्थाना संधर्भात पुराणात काही कथा सांगितल्या आहेत
एकदा ब्रम्हदेवाच्या मनात चंचलता निर्माण झाली. आपल्या मनातील चंचलता कमी व्हावी यासाठी ब्रम्हदेवाने श्रीगणेशाची आराधना केली. त्यामुळे ब्रम्हदेवाच्या मनातील चंचलता नाहीशी होऊन त्यांचे मनाला शांतता लाभली. त्या मुळे या ठिकाणी ब्रम्हदेवाने श्री गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. व या गणेशाला मनाची चिंता दुर करणारा “चिंतामणी” असे नांव दिले.
अहल्येचा पातिव्रत्य केल्याबद्दल गौतम ऋषींनी इंद्रला शाप दिला. इंद्र भयभीत झाला व त्याने गौतम ऋषींची क्षमा मागीतली व उ:शाप देण्याची विनंती केली. गौतम ऋषींच्या आज्ञेने इंद्राने या स्थानावर इंद्राने गणेशाची स्थापना केली व तपश्चर्या केली त्या मुळे तो शाप मुक्त झाला. या ठिकाणी बसून इंद्राने तपश्चर्या केली व त्या गणेश मुर्तीस ‘चिंतामणी’ असे नांव दिले.
मंदिर परिसरात राजा शिंगणदेव व माधवराव पेशवे, त्यांचे बरोबर बरोबर सती गेलेल्या त्यांचे पत्नी रमाबाई पेशवे यांची समाधी स्थाने आहेत, माधवराव पेशवे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार त्यांनी केला. येथे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते चतुर्थी या काळात द्वार यात्रा असते.
*

४) महागणपती, रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे,)

ranjangoan
महाराष्ट्रात पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्यात रांजणगांव येथे पुणे-नगर मार्गावर पुण्या पासून ५० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. अष्टविनायकापैकी हा श्री महागणपती.रांजणगावचे मुल नाव मणीपुर असे होते त्याचे पुढे रांजणगांव झाले
पेशव्यांनी ईस १७९० मध्ये येथील गर्भगृहाचे काम केले, सरदार किबे यांनी मंडपाचे काम केले, सरदार पवार व शिंदे या मंदिराच्या ओवर्या बांधल्या. गर्भगृहातील शेंदूरचर्चित महागणपतीची मूर्ती बैठी आहे श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे.
या स्थान निर्मिती विषयी अनेक कथा प्रचलित आहेत
फार पुरातन काळी गृत्समद नावाचे एक थोर विद्वान ऋषी होवून गेले. ते महान गणेश भक्त होते. एकदा त्यांच्या शिंकेतून एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला. गृत्समदाने त्याला आपला पुत्र मानले. मी मोठा झाल्यावर तीन्ही लोकांवर राज्य करेल असे तो मुलगा म्हणाला मग गृत्समदाने ‘गणानां त्वां’ या गणेश मंत्राचा उपदेश केला. त्या मुलाने जंगलात जावून गणेशाची उपासपा केली गणेशाने प्रसन्न होवून प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. श्री शंकराशिवाय तुला कोणीच पराभुत करणार नाही असाही वर दिला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत झाला. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. त्याने सर्व देवांना जिंकले. तेव्हा शेवटी सर्व देव शंकराला शरण गेले. त्रिपुरासूरा बरोबरील युध्दात विजय प्राप्त व्हावा म्हणुन भगवान शंकराने या ठिकाणी श्री महागणपतीच्या मुर्तीची स्थापना केली. नंतर शंकराचे व त्रिपुरासूराचे फार मोठे युध्द झाले. व शेवटी शंकरांनी एकाच बाणाने त्रिपुरासूराचा नाश केला. तोच हा श्री महागणपती.
भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते षष्टी या काळात येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो.
*

५) विघ्नेश्वर, ओझर (ता. जुन्नर, जि. पुणे,)

ojhar
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारायण गांवापासुन जवळच असलेल्या ओझर या गांवात अष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे स्थान पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरले बाजीराव पेशवे व चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मंदिराचे कडेला येडगाव धरणाचा विस्तीर्ण जलाशय असुन मंदिराचे सभोवती तटबंदी आहे, मंदिराचे प्रांगणात दोन दीपमाळा आहेत. गर्भगृहातील विघ्नहर डाव्या सोंडेचा असुन श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. बाजूला पितळी रिद्धी सिद्धी च्या मूर्ती आहेत. या शिवाय सुर्य, महादेवी, विष्णू शंकर पार्वती यांच्या मूर्ती आहेत.
या स्थान विषयी काही कथा प्रचलित आहेत.
प्राचीन काळी या विघ्नासूराने पृथ्वी व देव लोकांवरील सर्वच वैदिक सत्कर्माचा नाश करण्यास सुरूवात केली. देवांवर सर्वात मोठे संकट निर्माण झाले. तेव्हा सर्व देवांनी गणेशाची आराधना करण्यास सुरूवात केली. देवांच्या आराधनाने श्री गणेश प्रसन्न झाले.
श्री गणेशाने पराशर ऋषींचा पुत्र होवून विघ्नासूराशी प्रचंड युध्द केले . गणेशाच्या प्रचंड शक्ती मुळे विघ्नासूर जेरीस आला. तेव्हा गजाननाने त्याला आज्ञा केली की,”ज्या ठिकाणी माझे भजन-पुजन-किर्तन चालु असेल तेथे तु जाता कामा नये” त्यावर विघ्नासूराने गजाननाजवळ वर मागीतला, ” तुमच्या नावामागे माझे नांव असावे.’विघ्नहर’ किंवा ‘विघ्नेश्वर’ असे नांव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे.व माळा तुझे गणात सामावून घ्यावे ” त्यावर श्री गणेशाने त्याला आपल्या गणांच्या समुदायात समाविष्ठ करून घेतले आहे. विघ्नासूराचा पराभव केला म्हणुन येथील गणेशास ‘विघ्नेश्वर’ किंवा ‘विघ्नहर’ असे नांव प्राप्त झाले.
भाद्रपद शुध्द चतुर्थी व माघ शुध्द चतुर्थी असे दोन उत्सव मोठयाप्रमाणात साजरे केले जातात.
*

६) गिरिजात्मज, लेण्याद्री (ता. जुन्नर, जि. पुणे,)

lenyadri
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुण्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या उत्तर पश्चिम तीरावर हे स्थान वसलेले आहे. हे स्थान डोंगरात कोरून काढले असल्यामुळे ह्या स्थानाला ‘लेण्याद्री’ असे म्हणतात अष्टविनायकापैकी हा श्री गिरीजात्मज. या ठिकाणाचा प्राचीन उल्लेख जीर्नापूर,व लेखन पर्वत असा आढळतो,येथील लेण्यांना गणेश लेणी असे म्हणतात. .या देवस्थानचे पूर्व व पश्चिम बाजूस एकूण २८ लेण्या आहेत. या लेण्या मधील सातव्या लेणीत श्री गिरीजात्मज.स्थान आहे. या लेणी मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्‍या आहेत गणेशाचे स्थान असलेली लेणी ५१ फुट रुंद व ५७ फुट लांब असुन लेणीत वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. येथील श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. या ठिकाणी गणेशाचे पाठीचेच दर्शन होते.
या ठिकाणाचे निर्मिती विषयी पार्वतीची कथा प्रचलित आहे.
पार्वतीच्या मनात अशी ईच्छा होती की, गजानन आपला पुत्र व्हावा म्हणुन तीने लेण्याद्री पर्वताच्या गुहेत बारा वर्ष तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाले. भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करून मुर्तीची पुजा अर्चा केली. तेव्हा ती मुर्ती सचेतन होवून पार्वती पुढे प्रकट झाली. बाल गणेश येथेच वावरला येथे गौतम ऋषींनी गणेशाची मुंज केली. पुढे गजाननाचा ‘मयुरेश्वर’ अवतार येथेच झाला असे मानले जाते. भाद्रपद शुध्द चतुर्थी व माघ शुध्द चतुर्थी असे दोन उत्सव मोठया प्रमाणात साजरे होतात.
*

७) वरद विनायक, महड (ता. खालापूर, जि. रायगड)

mahad

 

रायगड जिल्हयातील खालापूर तालुक्यात महड या गावी आहे. हे स्थान मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर आहे, रेल्वे अथवा बसने खोपोली किवा खोपोली फाट्यावरून येथे जाता येते. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. हा कौलारू मंडप सुभेदार बिवलकरांनी बांधला. जुन्याकाळी येथील मूर्तीचे संरक्षण व्हावे ती शेजारील तळ्यात लपवून ठेवली होती येथील गणेश भक्त भारती यांना श्रींनी दृष्टांत दिला व मी तळ्यात असल्याचे सांगितले त्यांनी हि मूर्ती तळ्यातून काढून तिची स्थापना केली. गर्भगृहातील हि मूर्ती पूर्वाभिमुख बैठी डाव्या सोंडेची आहे. शेजारी रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती आहेत.
या स्थानाविषयी एक कथा आहे.
प्राचीन काळी भीम नावाचा राजा होवून गेला त्याला रुक्मागंद नावाचा पुत्र होता. तो एकदा शिकारी साठी वनात गेला असतांना विश्रांतीसाठी येथील ऋषीच्या आश्रमात थांबला. रक्मागंदच्या तारुण्यावर भाळून ऋषीची पत्नी मुकुंदा त्याच्यावर भाळली. तिने रुक्मागंदाला आपल्या मनातला इच्छा सांगितली . पण रुक्मागंदाने नकार दिला. काम आतुर मुकुंदेने रुक्मागंदला ‘तु कुष्ठ रोगी होशील ‘ असा शाप दिला, रुक्मागंद तेथून गेल्यावर कामवासनेने व्याकुळ झालेली मुकुंदेची अवस्थापाहून इंद्राने रुक्मागंदाचे रुप घेवून मुकुंदेची इच्छा पुर्ण केली. त्याच्या पासून मुकुंदेला पुत्र प्राप्ती झाली. त्याच पुत्राचे नांव गृत्समद ऋषी. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहीती झाली होती. तु ऋषी पुत्र नाही म्हणून त्याचा नेहमी अपमान होवू लागला. तेव्हा गृत्समदाने मुकुंदे कडून सत्य जाणून घेतले. व तिला शाप दिला व मुकुंदेनेही त्याला शाप दिला की, तिन्ही लोकाला भयभीत करणारा राक्षस तुझ्या पोटी जन्माला येईल म्हणून पापमुक्तीसाठी गृत्सगंद पुष्पक वनात तप करु लागला. तपश्चर्या केल्यावर त्याला श्री गणेशाने प्रसन्न होवून वर मागण्यास सांगीतले. तेव्हा तो म्हणाला देवा तु सिध्दीदायी आहेस तेव्हा तु हया क्षेत्री कायमचे वास्तव्य कर. गणेशांनी ते मान्य करताच गृत्समदाने वरदविनायक या नावाने गजाननाच्या मुर्तीची स्थापना केली. भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी व माघ शुध्द प्रतिपदा ते पंचमी या दोन कालावधीत येथे प्रमुख उत्सव साजरे होतात.
*

८) बल्लाळेश्‍वर, पाली (ता. सुधागड, जि. रायगड)

pali

रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात पाली हे स्थान स्थान आहे. अष्टविनायकांपैकी हे स्थान खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल – गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पाली कडे रस्ता जातो. या गावाचा प्राचीन उल्लेख पल्लीपूर असा होत असे पुढे ते पाली झाले. येथील श्री बल्लाळेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असुन, येथे दोन तलाव आहेत मंदिराचे सभोवताली दगडी फरासबंदी आहे. देवालयाचे बांधकाम चिरेबंदी आहे, मंदिराचे जीर्नाधाराचे काम ईस १७७० मध्ये बाबा फडणीस यांनी केले. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. पुढे ईस १९०५ मध्ये भाऊ हिंगे यांनी सभा मंडपाचे काम केले.
श्री बल्लाळेश्वर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. समोर मूषक वाहन आहे.
या मंदिरा विषयी एक कथा प्रचलित आहे
फार पुर्वी गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याला बल्लाळ नावाचा एक मुलगा होता तो आपल्या मित्रासोबत गावाबाहेर दगडाचे देव करायचे. फुले पाने तोडून त्या देवांची पुजा करायची असे खेळ तो खेळत असे. एक दिवस बल्लाळ आपल्या मित्रांसोबत जंगलात खेळायला गेला होता तेथे त्याला एक दगड सापडला त्याने त्याचा गणपती केला . व त्याची पुजा करु लागला. बराच वेळ हा खेळ असाच चालु राहिला त्यामुळे ती मुले घरी परतली नाहीत . गावातल्या लोकांनी बराच वेळ शोध घेतल्यावर ती मुले बल्लाळ सोबत जंगलात आढळली. तेव्हा गावकर्‍यांनी चिडून त्याच्या वडीलांकडे बल्लाळाची तक्रार केली, कल्याण रागानेच जंगलाकडे गेले तेथे सर्व मुले गणपतीच्या खेळात नाचत होती. व बल्लाळ ध्यान लावून बसला होता. मुलांनी तयार केले ले मंदिर कल्याणने उध्वस्त केले. ते पाहताच मुलांनी तेथुन पळ काढला. पण बल्लाळ मात्र ध्यान लावून बसला होता. ते पाहून कल्याणने बल्लाळला मारले. पण त्याचे ध्यान तुटले नाही. ते पाहून कल्याण अधिक चिडला व त्याने बल्लाळाला झाडाला बांधले. पण बल्लाळ मात्र गणेशाचा जप करत होता. बल्लाळाला बांधून कल्याण घरी निघून गेला तरी त्याचा जप चालुच होता. थोडयावेळाने त्याचे डोळे उघडले. तेव्हा त्याला दिसले गणपतीचे मंदिर मोडले आहे. तो म्हणाला ज्याने तुझी अवस्था केली आहे तो आंधळा, मुका व बहिरा होईल. त्याच्या शरीरातुन दुर्गंधी बाहेर पडेल. ते बोलुन पुन्हा तो श्री गणेशाची पुजा करायला लागला. त्याच्या भक्तीला प्रसन्न होवून गणेशाने त्याला दर्शन दिले, तेव्हा श्री गणेश म्हणाले तुला काही मागायचे असेल तर मागुन घे. हे एकुण बल्लाळ म्हणाला मला वर देणा असेल तर ऐवढाच द्यावा की आपल्या ठिकाणी माझी भक्ती कायम राहावी. व आपण या ठिकाणी कायम वास्तव्य करुन भक्ताची सर्व संकटे दुर करवीत गणेशाने मी येथे वास करेल. व माझे हे स्थान बल्लाळविनायक म्हणून प्रसिध्द होईल असा वर दिला. भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते षष्टी व माघ शुद्ध प्रतिपदा ते षष्टीया कालावधीत येथे प्रमुख उत्सव होतो.

*

गणेश आरती, मंत्र, स्तोत्र

श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी , पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झलके माळ मुक्ता फळांची
जय देव जय देव जय मंगलमूतीँ
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जय देव जय देव ॥ ध्रु ॥
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा
चंदनाची उटी कुंमकुमकेशरा
हिरेजडित मुकूट शोभतो बरा
रुणझुणती नुपूरे चरणी घागरिया
जय देव जय देव जय मंगलमूतीँ
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जय देव जय देव ॥ १ ॥
लंबोदर पीतांबर फणिवरवंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना
जय देव जय देव जय मंगलमूतीँ
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जय देव जय देव ॥ २ ॥

गणपती अथर्वशीर्ष

ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि।
त्वमेव केवलं कर्ताऽसि।
त्वमेव केवलं धर्ताऽसि।
त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम्॥१॥
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि॥२॥
अव त्वं मां। अव वक्तारं।
अव श्रोतारं। अव दातारं।
अव धातारं। अवानुचानमव शिष्यं।
अव पश्चात्तात्। अव पुरस्तात्।
अवोत्तरात्तात्। अव दक्षिणात्तात्।
अव चोर्ध्वात्तात। अवाधरात्तात।
सर्वतो मां पाहि पाहि समंतात्॥३॥
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥४॥
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।
सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:।
त्वं चत्वारि वाक्पदानि॥५॥
त्वं गुणत्रयातीत:। त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत:। त्वं कालत्रयातीत:।
त्वं मुलाधारस्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्तित्रयात्मक:।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तवं
रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रह्मभूर्भुव:स्वरोम्॥६॥
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।
अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं।
तारेण ऋध्दं। एतत्तव मनुस्वरूपं।
गकार: पूर्वरुपं। अकारो मध्यमरूपं।
अनुस्वारश्चान्त्यरुपं। बिन्दुरुत्तररुपं।
नाद: संधानं। स हिता संधि:।
सैषा गणेशविद्या:। गणक ऋषि:।
निचृद्वायत्रीच्छंद:। गणपतिर्देवता।
ॐ गं गणपतये नम:॥७॥
एकदंताय विद्महे।
वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नो दंती प्रचोदयात्॥८॥
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्।
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।
रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्।
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृते: पुरुषात्परम्।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर:॥९॥
नमो व्रातपतये। नमो गणपतये।
नम: प्रमथपतये। नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय।
विघ्ननाशिने शिवसुताय।
श्रीवरदमूर्तये नमो नम:॥१०॥

फलश्रुति

एतदथर्वशीर्षं योऽधिते।
स ब्रह्मभूयाय कल्पते।
स सर्वत: सुखममेधते।
स सर्वविघ्नैर्नबाध्यते।
स पञ्चमहापापात्प्रमुच्यते॥
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति।
सायंप्रात: प्रयुंजानो अपापो भवति।
सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति।
धर्मार्थकाममोक्षं च विंदति॥
इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम्।
यो यदि मोहाद्दास्यति।
स पापीयान् भवति।
सहस्त्रावर्तनात् यं यं काममधीते
तं तमनेन साधयेत्॥११॥
अनेन गणपतिमभिषिंचति।
स वाग्मी भवति।
चतुर्थ्यामनश्नन् जपति।
स विद्यावान् भवति।
इत्यथर्वणवाक्यं।
ब्रह्माद्यावरणं विद्यात्।
न बिभेति कदाचनेति॥१२॥
यो दूर्वांकुरैर्यजति।
स वैश्रवणोपमो भवति।
यो लार्जैर्यजति स यशोवान् भवति।
स मेधावान् भवति।
यो मोदकसहस्त्रेण यजति।
स वाञ्छितफलमवाप्नोति।
य: साज्यसमिभ्दिर्यजति।
स सर्वं लभते स सर्वं लभते॥१३॥
अष्टौ ब्राह्मणान् समम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति।
सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्ता सिध्दमंत्रो भवति।
महाविघ्नात्प्रमुच्यते।
महादोषात्प्रमुच्यते।
महापापात् प्रमुच्यते।
स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति।
य एवं वेद इत्युपनिषद्॥१४॥

————————–

श्रीगणपतीची अष्ठोत्तरशत नामावली

विघ्नेशाय नमः । विश्ववरदायानमः । विश्वचक्षुषे नमः । जगत्प्रभवे नमः । हिरण्यरुपाय नमः ।
सर्वात्मने नमः । ज्ञानरुपाय नमः । जगन्मयाय नमः । ऊर्ध्वरेतसे नमः । महाबाहवे नमः ।
अमेयाय नमः । अमितविक्रमाय नमः । वेदवेद्याय नमः । महाकालाय नमः । विद्यानिधेय नमः ।
अनामयाय नमः । सर्वज्ञाय नमः । सर्वगाय नमः । शांताय नमः । गजास्याय नमः ।
चित्तेश्वराय नमः । विगतज्वराय नमः । विश्वमूर्तये नमः । अमेयात्मने नमः । विश्वाधाराय नमः ।
सनातनाय नमः । सामगाय नमः । प्रियाय नमः । मंत्रिणे नमः । सत्वाधाराय नमः ।
सुराधीशाय नमः । समस्तसाक्षिणे नमः । निर्द्वंदाय नमः । निर्लोकाय नमः । अमोघविक्रमाय नमः ।
निर्मलाय नमः । पुण्याय नमः । कामदाय नमः । कांतिदाय नमः । कामरुपिणे नमः ।
कामपोषिजे नमः । कमलाक्षाय नमः । गजाननाय नमः । सुमुखाय नमः । शर्मदाय नमः ।
मूषकाधिपवाहनाय नमः । शुद्धाय नमः । दीर्ढतुंडाय नमः । श्रीपतये नमः । अनंताय नमः ।
मोहवर्जिताय नमः । वक्रतुंडाय नमः । शुर्पकर्णाय नमः । परमाय नमः । योगीशाय नमः ।
योगधेम्ने नमः । उमासुताय नमः । आपद्वंत्रे नमः । एकदंताय नमः । महाग्रीवाय नमः ।
शरण्याय नमः । सिद्धसेनाय नमः । सिद्धवेदाय नमः । करुणाय नमः। सिद्धाय नमः ।
भगवते नमः । अव्यग्राय नमः । विकटाय नमः । कपिलाय नमः । ढुंढीराजाय नमः ।
उग्राय नमः । भीमोदराय नमः । शुभाय नमः । गणाध्यक्षाय नमः । गणेशाय नमः ।
गणराध्याय नमः । गणनायकाय नमः । ज्योतिस्वरुपाय नमः । भूतात्मने नमः । धुम्रकेतवे नमः ।
अनुकूलाय नमः । कुमारगुरवे नमः । आनंदाय नमः । हेरंबाय नमः । वेदस्तुताय नमः ।
नागयज्ञोपवीतिने नमः । दुर्धर्षाय नमः । बालदूर्वांकुरप्रिताय नमः । भालचंद्राय नमः । विश्वधात्रे नमः ।
शिवपुत्राय नमः । विनायकाय नमः । लीलासेविताय नमः । पूर्णाय नमः । परमसुंदराय नमः ।
विध्नाधकाराय नमः । प्रथमपूजिताय नमः । दिव्यपादाब्जाय नमः । भक्तमंदराय नमः । शूरमहाय नमः ।
रत्नसिंहासनाय नमः । मणिकुंडमंडिताय नमः । भक्तकल्याणाय नमः । अमेयाय नमः । कल्याणगुरवे नमः सहस्त्रशीर्ष्णे नमः । महागणपतये नमः ।

 

*

महाराष्ट्र देवी मंदिरे

मातृदेवता मानवी संस्कृतीत आद्यशक्ती मानली जाते. भुमीला माता मानणाऱ्या भारतीय संस्कृतीत तीला सर्वत्र स्थान आहे. आपल्या प्राचीन ऋग्वेदाचे ऋचा मधील अदिती पासुन ते आजच्या लोकगीतातून तीचा महिमा वर्णन केला आहे.
हजारो वर्षापुर्वीच्या सिंधुसंस्कृती मधील मृण्मयमुर्ती पासुन, शिरोविहीन उत्तानपाद लज्जागौरी ते गावागावा मधील अनघड तांदळा रूपातील ग्रामदेवता, कलाकारांनी घडविलेल्या अनेक भुजांनी, आयुधांनी, वाहनांनी नटलेल्या, अशा विविध रुपात ती सर्वत्र नांदत आहे.

अदिती

aditi - prakruti
अदिती हि सर्व देवतांची माता मानली जाते. साध्या डोळ्यांनी पृथ्वी, आकाश, अगर त्या पलीकडचे आपण जे काही पाहू शकतो ते सर्वकष म्हणजे अदिती, अदिती स्वर्ग आहे, अदिती अंतरीक्ष आहे, जगन्माता, पिता. पुत्र, देव, पंचमहाभुते म्हणजेच अदिती होय. भूमी प्रकृती सर्वांचे पालन पोषण करते व तीच सर्वांची जन्मदात्री अशी हि आदि व अंत अशी शाश्वत माता, आदिशक्ती. अत्यंत विस्तीर्ण अनेक शुभकार्य करणारी, यज्ञ, पालक, अनेक संकटातुन पार करणारी कधी वार्धक्य न पावणारी, अत्यंत गमनशील, जगातील प्राणीमात्रांची जन्मदात्री आश्रयदात्री असे अदितीचे वर्णन शुक्ल यजुर्वेदात केले आहे.

वैदिक देवता
वेदकाळा मधे यज्ञयागाना महत्वाचे स्थान होते, वेदकाळा मधे शक्ती देवतांची स्थान अल्प प्रमाणात जाणवते, वेदामधून अनेक आदिशक्ती देवतांचे उल्लेख आढळतात तर काही देवतांची सूक्ते हि आढळतात, वैदिक काळात या मातृदेवतांचा उल्लेख विविध ठिकाणी आढळतो
१) अदिती, २) अपोदेवी ३) ईडा ४) उषा ५) गायत्री ६) निष्ट्रीगी ७) पृथ्वी ८) योगमाया ९) भगवती १०) लक्ष्मी ११) वेदवती १२) सरस्वती १३) संध्या १४) इंद्राणी १५) उर्वशी १६) श्री १७) गोधा १८) घोषा १९) जुहू २०) दिती २१) दक्षिणा २२) मेधा २३) यमी २४) रोमषा २५) शत्री २६) लक्ष्या २७) लोपामुद्रा २८) विश्ववारा २९) वाक ३०) नारी ३१) शाश्वती ३२) सरमा ३३) श्रद्धा ३४) सर्वराज्ञानीं ३५) सूर्या ३६) सावित्री

सिंधुसंस्कृती

sindhu sanskruti
सिंधुनदीच्या खोर्या मधील उत्खननात सापडलेल्या संस्कृतीचा काळ साधारण पणे ईसवी सन पुर्व ३००० ते २५०० वर्षांचा धरला जातो. या उत्खननात अनेक अवशेष सापडले आणि एक प्राचीन समृद्ध संस्कृती उजेडात आली, या ठिकाणी अनेक मातृदेवताच्या मातीच्या प्रतिमा सापडल्या आहेत या वरून त्या काळी हि शक्ती पुजा अस्तित्वात होती. या प्रतिमा जीर्णावस्थेत असल्या तरी या शक्ती देवता आहेत हे निश्चित

लज्जागौरी
लज्जागौरी हे देवीचे विचित्र नाव वाटते त्याच पद्धतीने तिच्या प्रतिमा हि विचित्रच वाटतात, भारताच्या विविधभागातील मंदिरातून तर काही ठिकाणी स्वतंत्र मंदिरातून या प्रतिमा विराजमान आहेत, उत्खननामधुन मिळालेल्या तिच्या काही दगडी व मातीच्या मुर्ती विविध संग्रहलया मधुन ठेवल्या आहेत, या मुर्ती नग्न व उताण्या निजलेल्या अवस्थेतील आहेत, यांच्या हातात कमळ असुन काही प्रतिमा शिरोविहीन आहेत, तर काही प्रतिमा मधे शिराचे जागी कमळ पुष्प आहे, देवी विषयक धार्मिक प्रतिष्टित ग्रंथात याचा उल्लेख आढळत नाही, देवता विषयी अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांचे मते या प्रतिमा वैदिकदेवी अदितीच्या आहेत, ज्या मंदिरामध्ये या पुजेत आहेत त्या ठिकाणी त्यांना भूदेवी, रेणुका म्हणुन संबोधले जाते

योगिनी ( मातृका )

shiv sati
ब्रह्माड निर्मितीसाठी महेशांनी लघुरूपाने आदिशक्तीचे शरीरात प्रवेश केला व तीने ब्रह्मानंदाची प्राप्ती करणारे भव्य रूप प्रगट केले या रूपाचे तेजोमंडळातुन काही आनंदी हास्यकरणाऱ्या व गर्जनां करणाऱ्या अनेक नारी प्रगट झाल्या त्याच या विश्वनिर्माण करणाऱ्या योगिनी होय अशी कथा योगिनी तंत्रामधे आहे आदिशक्ती निर्माण झालेल्या या शक्ती ची संख्या विविध ग्रंथा मधुन भिन्न आढळते व त्यांच्या निर्मितीच्या वेगवेगळ्या कथा हि अस्तित्वात आहेत

सप्तमातृका

sapta matruka
मातृकांची संख्या भिन्न सांगितली जात असली तरी विविध शिल्पपट व विविध लिखाणातून सात मातृका प्रमुख मानल्या जातात. या प्रमुख मातृकांचे नावांमध्येही भिन्नता दिसते, त्यातील या काही प्रमुख मातृका

चौसष्ट योगिनी ( मातृका )

Chusashta yogini
योगिनीच्या संख्येचा विचार केल्यास तीचा बराचसा विस्तार झालेला दिसतो. या विस्तारा मुळे त्यांची संख्या अमर्याद झालेली दिसते. पण त्यांची संख्या हि चौसष्ट मानली जाते. अस्तित्वात असणाऱ्या योगिनी मंदिरात चौसष्ट मातृका प्रतिमाच आढळून येतात. आपल्या कडे श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या दिवशी चौसष्ट मातृकांचे पुजन केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे नावात पाठभेद आढळुन येतो. चौसष्ट योनी व चौसष्ट कलांच्या या जन्मदात्री मानल्या जातात. मंदिरा मधील मातृकांच्या नावातही व काही ठिकाणी त्यांचे मुर्ती व नावामध्ये फरक जाणवतो आपल्या कडील पिठोरी अमावस्या व्रतात या मातृकांचा नाम उल्लेख आढळतो
१) दिव्ययोगी २) महायोगी ३) सिद्धयोगी ४) गणेश्वरी ५) प्रेमाक्षी ६) डाकिनी ७) काली ८) कालरात्री ९) निशाचरी १०) झंकारी ११) रौद्रवताली १२) भूतली १३) भुतडांबरी १४) ऊर्ध्वकेशी १५) विरूपाक्षी १६) शुष्कांगी १७) नरभोजणी १८) भट्टारी १९) वीरभद्रा २०) धुम्राक्षी २१) कलहप्रिया २२) राक्षसी २३) घोररक्ताक्षी २४) विश्वरूपा २५) भयंकरी २६) चंडिका २७) कौमारी २८) वाराही २९) मुंडधारिणी ३०) सासुरी ३१) रौद्रा ३२) भीषणा ३३) त्रिपुरान्तिका ३४) भैरध्वसीनी ३५) क्रोधी ३६) दुर्मुखी ३७) प्रेतवाहिनी ३८) खट्वांगी ३९) दीर्घलंबोष्टी ४०) मालिनी ४१) मंत्रयोगिनी ४२) चक्री ४३) कालाग्नी ४४) ग्रहणी ४५) कंकाळी ४६) भुवनेश्वरी ४७) कटकी ४८) किटीनी ४९) रौद्री ५०) यमदूती ५१) कारालिनी ५२) घोराक्षी ५३ ) कार्मुकी ५४) काकदृष्टी ५५) अधोमुखी ५६) मुंडाग्रधारिणी ५७) व्याघ्री ५८) किंकिणी ५९) कालभाषिणी ६०) कामाख्या ६१) उष्ट्रानी ६२) योगपिठीका ६३) महालक्ष्मी ६४) एकविरा

पौराणिक देवता
वेदकाळा नंतर पौराणिक पुराणांच्या रचनांचा काळ सुरु झाला. यज्ञ यागाबरोबर देवतांची मंदिरे निर्माण होवू लागली, मंदिरामधुन मुर्ती पुजा होवू लागल्या त्यांची पुराणे निर्माण झाली, अशा विविध पुराणामधुन या शक्तीदेवतांचा उल्लेख विविध ठिकाणी आढळतो
१) श्रीदेवी २) अंबिका ३) अभ्यंबा ४) अलक्ष्मी ५) आनंदनायकी ६) उनाई ७) उमा ८) काळरात्री ९) कुंडिका १०) कुलकुल्या ११) कौशिकी १२) कंकाळी १३) गजांतलक्ष्मी १६) गौरी १७) चंद्रवदनी १८) चंद्रघन्टा १९) कुष्माडीनी २०) ब्रह्माचारिणी २१) महागौरी २२) सिद्धीदात्री २३) स्कंदमाता २४) शैल्यपुत्री २५) चक्रपदी २६) जगदात्री २७) दुर्गा २८) निलसरस्वती २९) पद्मावती ३०) प्रांत्यगीरा ३१) पार्वती ३२) चंपावती ३३) बगलामुखी ३४) बळातिबळा ३५) भुवनेश्वरी ३६) महिषासुरमर्दिनी ३७) महाकाली ३८) महासरस्वती ३९) माखानदेवी ४०) मुकांबिका ४१) योगेश्वरी ४२) रासईदेवी ४३) वृंदा ४४) विद्यादेवी ४५) वैष्णवी ४६) शताक्षी ४७) वत्स्तलादेवी ४८) शिवदूती ४९) सहस्त्रकाळमाया ५०) संज्ञा ५१) हुंकारेश्वरी

मातृशक्ती

devi aditi with her child barhma vishnu mahesh (Copy) (Copy)
विश्वनिर्मिती नंतर प्रथम मातृशक्तीची निर्मिती झाली, त्या शक्तीने ब्रह्मा, विष्णू, महेश यांना निर्माण केले. या मातृशक्तीच्या धडापासून सरस्वती, शिरापासून लक्ष्मी व पाया पासुन महेशी निर्माण झाली. व त्या ब्रह्मा, विष्णु, महेश, यांच्या पत्नी झाल्या अशा आशयाची कथा देवी भागवतात आहे. श्री देव्याथर्वशीर्षम मधे हि आदिशक्ती मी ब्रह्मस्वरूप आहे, माझ्या प्रकृती पासुन परुषात्मक सत असत उत्पन झाले, ब्रह्म, वेद, रूद्र, वसु, पूषा, विष्णु सर्व मीच आहे, मी ब्रह्मशक्ती सरस्वती रूपाने निर्मिती करते, विष्णुशक्ती लक्ष्मी रूपाने पालन करते व रूद्रशक्ती रूपाने संहार करते असे तिचे रूप ती देवतांना सांगत आहे. अशी हि सर्व व्यापक मातृशक्ती या जीवित विश्वाची आद्यमातृशक्ती होय,

saraswati parvati laxmi

आज सर्वत्र पुजनीय सर्व देवता या तीन देवतांची विविध रूपे मानली जातात.

नवदुर्गा

navdurga
देवीपुजे मध्ये अश्विन महिन्यातील नवरात्र महत्वपूर्ण मानली जातात, या दिवसात देवीची विविध नऊ रुपात पुजा केली जाते याच देवीच्या नऊ रूपांना नवदुर्गा असे म्हणतात
१) शैल्यपुत्री २) ब्रह्मचारिणी ३) चंद्रघंटा ४) कुष्मांडा ५) कात्यायनी ६) स्कंदमाता ७) महागौरी ८) कालरात्री ९) सिध्ददात्री

शक्ती पीठे
सतीचा पिता प्रजापती दक्ष याने आयोजित केलेल्या यज्ञात सतीचा पती शिवशंकरांचा अपमान दक्षाने केल्याने शिव पत्नी सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले. हे पाहुन क्रोधीत झालेल्या शिवाने विरभद्रास आज्ञा करून यज्ञाचा विध्वंस केला, व शोकाकुल अवस्थेत पत्नी सतीचे प्रेत घेऊन शिव सैरावैरा फिरू लागले या भ्रमनतीत सतीचे शरीराचे विविध अवयव ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी शक्ती पीठे निर्माण झाली. या पौराणिक कथेतून भारत भरातील विविध मंदिरे एकाच आदिशक्तीची मानली गेली
विविध लिखाणा मधुन या ठिकाणा विषयी व त्यांच्या संख्ये विषयी भिन्नता आढळते, हि संख्या कोठे १०८ तर काही लिखाणात ५१ मानली जाते. देवीभागवता मधे पुढील १०८ पीठ देवतांचा उल्लेख आहे.
१) विश्वलाक्षी २) लिंगधारिणी ३) ललिता ४) कामाक्षी ५) कुमुदा ६) गोमती ७) कामचारणी ८) मदोत्कटा ९) जयंती १०) गौरी ११) रंभा १२) कार्तीमती १३) विश्वेश्वरी १४) पुरूहुता १५) सन्मार्गदायिनी १६) नंदा १७) भद्रकर्णिका १८) भवानी १९) बिल्वपत्रिका २०) माधवी २१) भद्रा २२) जया २३) कमला २४) रुद्राणी २५) काली २६) कपिला २७) महादेवी २८) जलप्रिया २९) मुकुटेश्वरी ३०) कुमारी ३१) ललिताअंबिका ३२) मंगला ३३) उत्पलाक्षी ३४) महोत्पोला ३५) आमोक्षादी ३६) पाडळा ३७) नारायणी ३८) रुद्रसुंदरी ३९) विपुला ४०) कल्याणी ४१) एकविरा ४२) चंद्रिका ४३) रमणा ४४) मृगावती ४५) कोटवी ४६) सुगंधा ४७) त्रिसंध्या ४८) रतीप्रिया ४९) शुभानंदा ५०) नंदिनी ५१) रुक्मिणी ५२) राधा ५३) देवकी ५४) परमेश्वरी ५५) सीता ५६) विंध्यवासिनी ५७) महालक्ष्मी ५८) उमा ५९) आरोग्या ६०) माहेश्वरी ६१) अभया ६२) नितंबा ६३) मांडवी ६४) स्वाहा ६५) प्रचंडा ६६) चंडिका ६७) वरारोहा ६८) पुष्करावती ६९) देवमाता ७०) परावरा ७१) महाभागा ७२) पिंगळेश्वरी ७३) सिहिका ७४) अतीशांकरी ७५) उत्पला ७६) लोला ७७) लक्ष्मी ७८) अनंगा ७९) विश्वमुखी ८०) तारा ८१) पुष्टी ८२) मेधा ८३) भीमा ८४) तुष्टी ८५) शुद्धीकाया ८६) माता ८७) धरा ८८) धृती ८९) कळा ९०) शिवधारिणी ९१) अमृता ९२) उर्वशी ९३) औषधी ९४) कुशोदका ९५) मन्मंथा ९६) सत्यवादिनी ९७) निधी ९९) गायत्री १००) पार्वती १०१) इंद्राणी १०२) सरस्वती १०३) प्रभा १०४) वैष्णवी १०५) अरुंधती १०६) तिलोतमा १०७) विमला १०८) ब्रह्मकला
*

महाराष्ट्रातील शक्तीपीठे

भारतीय पातळीवर प्रमुख मानल्या जाणाऱ्या शक्तीपिठात महाराष्ट्रातील तुळजापुर, कोल्हापुर, माहूर, यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात साडेतीन पीठे असल्याचे मानले जाते, हि साडेतीन पिठाची संकल्पना ओंकाराचे साडेतीन मात्रांवर आधारित आहे, या साडेतीन पिठात महाराष्ट्रातील तुळजापुर, कोल्हापुर, माहूर, सप्तश्रुंगी वनी याचार स्थानांचा समावेश होतो त्यांचा हा परिचय
*

श्री तुळजाभवानी तुळजापूर

tuljapur
तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद पासुन २२ किमी अंतरा वर तुळजापूर मध्ये हे मंदिर आहे, सोलापूर शहरा पासुन हे ठिकाण ४४ किमी अंतरावर आहे.
तुळजाभवानी स्थान बालाघाट डोंगर रांगामध्ये वसलेले आहे. तुळजाभवानी मंदिर तुळजापूर गावातील पूर्णतः खोलगट भागात आहे. मंदिरा कडे जाण्यास शहाजीराजे महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार अशी दोन भव्य महाद्वारे आहेत. खाली उतरून जाण्यास सुंदर घडीव अशा पायऱ्या असून, या पायऱ्यांचे तीन टप्पे आहेत. मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. पहिला टप्पा संपताच एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ,. दुसरा टप्पा संपल्यावर उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तिसरा टप्पा संपल्यावर आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात पोहोचतो. येथे उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या काही पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन असुन होमकुंड सुमारे दहा फूट लांब – रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.
त्यापुढे मुख्य हेमाडपंती बांधणीचे दगडी मुख्य मंदिर आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा पितळी असून मंडपास सोळा दगडी खांब आहेत , देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपात बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघरा मध्ये देवीचा चांदीचा पलंग आहे. गर्भगृहात तुळजाभवानी मातेची गंडकी पाषाणाची पूर्वाभिमूख महिषासुर मर्दिनी रूपातील मूर्ती चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. या स्थाना विषयी काही कथा प्रचलित आहेत
प्राचीनकाळी कृतयुगात येथील वनात कर्दम ऋषी पत्नी अनुभूती सह या ठिकाणी राहत होते. कर्दम ऋषींचे मृत्यू समयी अनुभूती गरोदर होती त्यामुळे तिने सह गमन केले नाही पुढे प्रसूती झाल्यानंतर तिने तपश्च्रर्या सुरु केली. तिची तपश्च्रर्या सुरु असताना कुकुटनावाचा राक्षस या परिसरात आला. तपश्च्रर्य मध्ये मग्न अनुभूती त्याला दिसली तिला पाहून त्याची कामवासना अनावर झाली व त्याने तिला स्पर्श केला या स्पर्शाने तिची तपश्च्रर्या भंग पावली समोर कामातुर झालेला राक्षस पाहून तिने देवीचा धावा सुरु केला तीने आपल्या रक्षणासाठी भावभक्तीने केलेला धावा ऐकून त्वरित श्रीदुर्गा पार्वती भवानी माता धावून आली व राक्षसाचा वध केला.व तिला वर दिला व या ठिकाणी भक्त रक्षणा साठी वास केला हाकेला त्वरित धावून आली म्हणून हिचे नाव त्वरिता देवी, पुढे त्वरिताचे तुरजा झाले आणि काळाचे ओघात याचे मराठीत अपभ्रंश रूप म्हणजे तुळजा देवी असे झाले.
प्रभु रामचंद्र वनवासात असताना रावणाने सीतेचे हरण केले, प्रभू रामचंद्र तिचा शोध घेऊ लागले तेव्हा पार्वतीने त्यांची सत्व परीक्षा घेण्याचे ठरविले, व ती सीतेच्या रुपात त्यांचे समोर गेली, रामचंद्रांनी पार्वती मातेला ओळखले व तू का आलीस आई असे विचारले. तेव्हा पार्वतीने तुकाई नाव मिळाले व तिने येथे वास केला. पुढे तुकाई चे तुळजा झाले अशी हि एक लोककथा प्रचलित आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांनी या आपल्या कुलदेवतेला अर्पण केलेल्या पुतळीमाळेतील प्रत्येक पुतळीच्या मागे राजे शिवाजी अशी अक्षरे कोरलेली आहेत.
देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणी गृह आहे.
मंदिराचे सभोवतालीचे ओवर्या मध्ये जेजुरीचा खंडोबा व इतर देवतांची स्थाने आहेत. तुळजापूर गावात विविध देवी मंदिरे आहेत.
मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घटाची पूजा होते. देवीस दररोज दोन रोज सकाळ व संध्याकाळ अशी दोन वेळ पंचामृत अभिषेक पूजा केली जाते या पूजा कायमस्वरूपी असतात.
नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. नवमीला घटोत्थापन आणि . दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
*

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

kolhapur
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी श्रीमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर या जिल्ह्याचे ठिकाणी आहे .कोल्हापूरला प्राचीनकाळी गौरवाने दक्षिणकाशी म्हटले जाते असे. महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परीसरात पश्चिमाभिमुख आहे या मंदिराचे उल्लेख ईस च्या सुरवाती पासून मिळतात. या मंदिराच्या चारी दिशांना प्रवेश दरवाजे आहेत ईस ११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकीर्दीत दक्षिण दरवाजा व येथील अतिबलेश्‍वर मंदिर यांचे काम झाले. पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला ’महाद्वार’ असे म्हणतात ईस 1218 मध्ये यादव तौलम याने हे महाद्वार बांधले. मंदिराबाहेरील खांबांवर केलेलं कोरीव काम अत्यंत रेखीव आहे . मुख्य मंदिरचे काम दगडी असून मंदिर बाहेरुन तारांकित आकाराचे आहे. सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ. स. ६०० ते ७०० या शतका मधील असुन. नवव्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादिक्ष याने मंदिराचा जीर्नोधार केला. व येथील महाकालीचे मंदिर बांधले. मुख्य महालक्ष्मी मंदिरास एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे मंडपास अनेक खांब आहेत. मुख्य मंदिराला जोडून गरूड मंडप आहे. मंदिराच्या गर्भगृहात दगडी चबूतऱ्यावर श्रीमहालक्ष्मीची मूर्ती उभी आहे. मूर्ती पश्चिमाभिमुख असून ती चक्रावर उभी आहे, मूर्ती काळ्या रंगाच्या शिलेपासून बनविलेली आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असुन मूर्ती चतुर्भुज आहे तिचे वरच्या उजव्या हातात गदा तर डाव्या हातात ढाल आहे. खालच्या उजव्या हातात मातुलिंग व डाव्या हातात पानपात्र आहेत. मस्तकावर मुकुट असून त्यावर शेष नागाने छाया धरली आहे. उत्तराभिमुख योनी व लिंग आहे मागील बाजूस सिंह आहे. मागील बाजूचे चांदीची प्रभावळी वर चंद्रसूर्याच्या दोन आकृत्या आहेत.
महालक्ष्मी विषयी काही कथा प्रचलित आहेंत
गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णू चे भेटीस आले, विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला, बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णू जवळ जावून बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शाप दिला.हर ऐकून क्रोधीत झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शाप दिला. हत्तीण रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्ती साठी तपचर्या सुरु केली. ब्रह्मदेवानी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले
या स्थाना विषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे.
पुरातनकाळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याचे पुढे हतबल झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने बह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यू समयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्याचे नावा वरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले.कोल्हासूराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता,ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूवेर्कडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीरक्षेत्री जा. माझा राग गेला, पण मी येणार नाही. असं तिने सांगितलं. व तिने तेथेच वास केला
तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते.
मंदिराचा प्रदक्षिणेचा मार्ग जवळपास स्वस्तिकाच्या आकाराचा असून सोळा काटकोनातून प्रदक्षिणा घालावी लागते. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला श्रीमहाकाली व श्रीमहासरस्वती या देवींची मंदिरे आहेत.
या परिसरात सूमारे २५० देवी-देवतांची मंदिरे आहेत.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेपासूनचा नवरात्र उत्सव मोठा असतो. प्रतिपदेला बैठीपूजा, द्वितीयेला खडीपूजा, त्र्यंबोलीपंचमी दिवशी हत्तीच्या अंबारीतील, रथारूढ पूजा, मयुरारूढ पूजा, अष्टमीला महिषासूरमदिर्नी, सिंहवासिनी अशा रूपातील देवीच्या पूजा साकार होतात.
अष्टमीला घागरी फुंकण्या पद्धत आहे मध्यरात्रीपर्यंत धामिर्क सोहळे होतत. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीही होमहवन, शस्त्रपूजा होते. तिरुपती मंदिराकडून आलेला शालू त्या दिवशी नेसवला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवी हत्तीच्या अंबारीत बसते. संध्याकाळी तोफेची सलामी मिळाल्यावर देवीची पालखी निघते. दसरा चौकात शिलंगणाचा होणारा हा सोहळा संपन्न होतो. तिथे सोनं लुटण्याचा कार्यक्रम झाल्यावर देवीची पालखी परत मंदिराकडे निघते. व नवरात्र सोहळा संपन्न होतो
*

श्री रेणुकामाता माहूरगड

renuka mahuar
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे, किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, हौद यांचे अवशेष त्याचे गत वैभवाची साक्ष देत उभे आहेत, १४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला .
या सभामंडपवजा मंदिरात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे पुढे देवीची बैठक असुन देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे या बैठकीवर ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे.
या ठिकाणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची नगरी होती. त्या नगरीत इश्‍वाकू राज्याचा पुत्र रेणू राजा राज्य करीत होता रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून रेणुका प्रगटली. यथावकाश भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले व ती तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. ते भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले. त्यांचे सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू हि होती, रेणुकेला वसू, विश्‍वासू, बृहद्‌भानू, बृहत्कन्न आणि परशुराम ही मुले झाली.
रेणुका एकदा नदीवर गेली असता स्त्रियांसह मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला पाहून तीचे मनात कामूक भाव येतात ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व पुत्रांना तिची हत्या करण्यास सांगतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.
पाचवा पुत्र परशुरामास आज्ञा करतात,पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात. पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. त्यांना क्रोधाचा पश्‍चाताप होतो व ते रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात. व आपला क्रोध त्यागतात. पुढे राजा सहस्त्रार्जुन जमदग्नी आश्रमात येतो. त्याला तेथे असणार्या कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; .पण जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात. तेव्हा राजा आश्रमावर हल्ला करतो. सर्वांची हत्या करून रेणुकेला जखमी करून कामधेनूला घेऊन जातो
नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर पोहचला . तिथे असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले .या पाण्याने स्नान घालून व तेथेच दत्तात्रेयांचे पौरोहित्या खाली परशुरामाने जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. त्यानंतर परशुरामाला रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले. त्या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ठिकाणाला मातापूर नाव मिळाले पुढे त्याचे माहूर झाले.
या परिसरात महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. खालील बाजूस परशुराम मंदिर, गणपती मंदिर, पांडवतीर्थ , औदुबर झरा, अमृतकुंड, बोधतीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही स्थळे आहेत.

*

श्री सप्तश्रृंगी वणी

sapasrungi
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्रे स्थान सप्तश्रृंगी, नासिक जिल्ह्यातील हे स्थान नाशिकपासून ६५ किमी अंतरावर आहे
सप्तश्रृंगगडाचे पायथ्याचं गाव नांदुरी येथून घाटरस्ता सुरू होतो सुमारे दहा किमी अंतराचा हा घाटमार्ग आहे. ह मार्ग संपल्यावर आपण गडाचे पठारावर येऊन पोहोचतो. या पठाराची समुदसपाटी पासून उंची ४७०० फूट आहे.येथे गावठाण आहे. येथे समोर अंगावर येणारा सरळसोट कडा दिसतो. या कड्या मधेच एका प्रचंड दगडी गुहेत सप्तशृंगीचं स्वयंभू स्थान आहे मंदिरात वर जाण्यासाठी पाचशे बांधीव पायऱ्या आहेत. या मूळ पायऱ्यांचं बांधकाम पेशवेकालीन सरदार दाभाडे यांची पत्नी उमाबाई आणि कान्हेरे बंधू यांनी केल्याचे सांगतात .संपूर्ण पायरी मार्गावर छप्पर घातलेले आहे. पायऱ्या चढून गेल्यावर मंदिर आहे. देवीची उभी मूर्ती पूर्वाभिमुख भव्य अतिशय रेखीव असुन. आठ ते दहा फूट उंचीची आहे, अठरा भूजायुक्त मूतीचे हातात विविध आयुधे आहेत. देवीचा डाव्या बाजूचा एक हात कानाला टेकलेला आहे.
या ठिकाण विषयी दंतकथा असुन. मार्कंडेय ऋषी या ठिकाणी तपस्चर्या करीत होते, त्यांचे या तपाने देवी प्रसन्न झाली व तिचे आज्ञे ने त्यांनी या मूर्तीची स्थापना केली. गडावर मार्कंण्डेय ऋषीं आसनस्थ होऊन देवीला तिच्या पराक्रमाचा कथा ऐकवत व देवी किंचित मान वाकडी करुन ऐकत असे. देवीचे हे स्थान लोकांना परिचित नव्हते अनेक शतकापूर्वी या परिसरात धनगर आपली गुरे चरण्यासाठी नेत एका धनगरास येथे मधाचे पोळे दिसले ते काढत असताना त्याला देवीची मूर्ती दिसली व हे स्थान प्रकाशात आले.
गडावर व परिसरात कालीकुंड व सुर्यकुंड, जलगुंफा, शिवतिर्थ, तांबुलतिर्थ, मार्कंण्डेय दर्शन, शितकडा अशी धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे आहेत.
चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते, नवरात्र उत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना झाल्यानंतर सकाळी महापूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी आरतीचा कार्यक्रम असतो. नवमीच्या दिवशी शतचंडी याग केला जातो. मंदिराच्या मागे असलेल्या गुहेच्या माथ्यावर एक दुर्गम सुळका आहे. त्यावर निशाण चढवणं हा देवीच्या यात्रेतला हा नवरात्रीतला महत्त्वाचा कार्यक्रम असतो. कोजागिरी पौणिमेला लाखो भाविक गडावर येतात.
*

श्री एकविरा कार्ला

ekvira temple
कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवी परिचत आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळयापासून ११ किमीवर कार्ल्याच्या लेणीमध्ये या देवीचे मंदिर आहे, कार्ला येथे रेल्वे स्टेशन आहे. इंद्रायणी नदीच्या खोर्यात पाचशे फुट डोंगमाठ्यावर देवीचे स्थान डोंगरातील लेणी मध्ये असुन डोंगर चढून उंचावर असलेल्या या देवीचे दर्शन घ्यावे लागते. बुद्ध कालीन लेण्यांच्या परिसरात हे मंदिर आहे. ह्या मंदिराचा उल्लेख प्राचीन काला पासून आढळतो.
येथील स्तूपाचे बाजूला घुमटी वजा मंदिर असुन, या मंदिराचे आत मागील खडकात कोरलेली एक छोटी गुहा असुन यात एकविरा देवीची मूर्ती कोरलेली आहे. एकविरा देवी हे रेणुकेचे स्थान आहे, या देवीची एक अख्यायिका आहे. आदितीने तप करून भगवान शंकराला प्रसन्न केले. त्याने तिला वर दिला की इश्वाकू राजाच्या घरी तुझा जन्म होईल आणि तुझे नाव रेणुका असेल. पण तू एकविरा नावाने प्रसिद्ध पावशील तसेच तुला होणाऱ्या पाच पुत्रात एक पुत्र महावीर असेल. त्याच्या पराक्रमामुळे तू एकविरा म्हणून ओळखली जाशील.
मंदिर परिसरात सभोवती घनदाट झाडी. इंदायणी नदीचा प्रवाह आणि विसापूर, लोहगड, तुंग असे गडकल्ले, रमणीय वातावरण असे निसर्गाचे वरदान लाभले आहे.
*

श्री यमाई औंध

yamai auand
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध हे गाव येथील यमाई मंदिरा साठी प्रसिद्ध आहे. औंध हे स्वतंत्र्य पूर्व काळात संस्थानाचे ठिकाण होते. ईस १३०० पूर्वी चालुक्य घराण्यातील राजांनी हे गाव वास्व्ल्याचे मानले जाते. या गावाचे न्येरुतेस सुमारे १२५० फुट उंचीची टेकडी आहे या टेकडीवर यमाईचे मंदिर आहे . टेकडीच्या पायथ्यापासून मंदिराकडे जाण्यासाठी ४३२ पायऱ्यांचा पायरी मार्ग आहे. आता थेट गाडी रस्त्याने मंदिरा पर्यंत पोहचता येते. मंदिरा सभोवती दगडी तटबंदी असुन या तटबंदिस ५ बुरुज आहेत. आतील प्राकारात देवीचे भव्य दगडी मंदिर असुन मंदिरास सुंदर कळस आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असुन गर्भगृहात यमाईची त्रिशूल, गदा, बाण, पानपात्र, घेतलेली चतुर्भुज बैठी दगडी मूर्ती आहे तिच्या समोर देवीचा स्वयंभू तांदळा आहे.
या देवीच्या उत्पती बद्दल एक कथा प्रचलित आहे
प्राचिन काळी सीताहरणा नंतर व्याकूळ झालेल्या श्रीरामाची पार्वती ने या परिसरात सत्वपरीक्षा पहिली होती व येथे मोकळा तीर्थ निर्माण केले होते. हेच औंध परिसरात मोरळातीर्थ म्हणून प्रसिद्ध पावले होते. या नांदणीच्या पवित्र प्रवाहाचे ,गर्द झाडित ऋषी मुनी तप करीत होते, ऋषी आपल्या परिवारासह येथे नांदत होते
या तिर्थावर एकदा एका औंधासुराची वक्रदृष्टी पडली. आणि तो सर्वाना त्रास देवू लागला.हा त्रास सोडवण्यासाठी सर्व भक़्तगणांनी देवीच्या आराधनेचा शुभारंभ केला. अदिशक़्तिने ही आराधना ऐकली व ती त्या  औंधासुराचा नाश करण्यास सज्ज झाली. घनघोर युद्धानंतर त्या औंधासुराचा वध झाला. त्या औंधासुरानेही देवीकडे करुणा भाकली व औंधासूर नावाच्या असुराच्या नावावरून ‘औंध’ हे नाव अजरामर झाले. व ऋषी मुनीचे व भक्तांचे रक्षणा साठी देवीने येथे वास्तव्य केले.

yamai auand

औंध गावात देवीचे दुसरे मंदिर असुन येथील भवानपंत प्रतिनिधी यांनी हे बांधले.या मंदिरा समोर एक ८० फुट उंचीची दीपमाळ आहे. या मंदिराचे सभा मंडपात येथील संस्थानचा जुन्याकाळी दरबार भरत असल्याचे सांगितले जाते. पौष महिन्यात येथे उत्सव साजरा केला जातो. हा यात्रा उत्सव पौष द्वितिया ते पोर्णिमे पर्यंत चालतो,
*

श्री कमलजा करमाळा

kamalja karmala
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्याचे ठिकाणी गावाचे पूर्वेस अर्धा किमी अंतरावर हे कमलजा देवीचे मंदिर आहे. हा परिसर श्रीदेवीचा माळ म्हणून ओळखला जातो. मंदिराचे बांधकाम दगडी असुन मंदिराला भव्य दगडी कोट आहे, कोटास पूर्व पश्चिम बाजूने प्रवेशद्वार आहेत. दोन्ही प्रवेशद्वारावर गोपुरे आहेत, कोटास आतील बाजूने ९६ ओवर्या काढलेल्या आहेत. प्राकारात मंदिरा समोर दिपमाळा आहेत. मुख मंदिर सुंदर असुन त्यावर गगनचुंबी शिखर आहे. अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये सरदार असलेले राजे रावरंभा निंबाळकर यांनी इ.स. १७२७ ला मंदिराचे बांधकाम केले. कमलाभवानी देवी तुळजापूरच्या जगदंबा मातेचे रूप म्हणून ओळखली जाते. मंदिर परिसरातील ९६ पायरीची अष्टकोनी विहीर, ९६ खांबाचे मंदिर, ९६ ओवर्या, शिखरावर ९६ चित्रे, अशी ९६ आकड्यांची गुंफण या मंदिर निर्मितीत दिसते,
राजेरावरंभा निंबाळकर हे तुळजापूरच्या भवानी मातेचे भक्त होते. ते भवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला घोडय़ावरून जात असे. त्यांची भक्ती पाहून भवानी देवीने एकेदिवशी प्रसन्न होऊन त्यांना दृष्टांत दिला व वर मागण्यास सांगितले त्यानी भवानी मातेस असे मागणे घातले की, जगदंबेने करमाळा मुक्कामी यावे, जगदंबेने भक्तराजाची मागणी मान्य केली. परंतु एक अट घातली ती अशी की, राजाने मागे वळून पहावयाचे नाही. ठरल्याप्रमाणे राजा पुढे व जगदंबा मागे असा मार्गक्रमण तुळजापूरहून करमाळ्याकडे सुरू झाला.
करमाळा जवळ आलेअसताना जगदंबा माता आपल्या पाठीमागे आहे की नाही, हे त्यांनी पाहिले असता भवानी माता तेथेच अंतर्धान पावली. राजे रावरंभाने भवानी माता जेथे अंतर्धान पावली त्या ठिकाणी या मंदिराचे बांधकाम केले.
या मंदिर परिसरात महादेव, विष्णू, सुर्य,गणपती यांची मंदिरे आहेत.
या देवीचा प्रमुख उत्सव कार्तिक पौर्णिमा ते कार्तिक वद्य चतुर्दशी असा चार दिवस चालतो.या काळात रोज देवीचे उत्सव मूर्तींचे घोडा, हत्ती, नंदी इत्यादी वाहनावर मिरवणूक काढली जाते. कुस्त्यांचे स्पर्धा हि आयोजित केल्या जातात.
या मंदिरात नवरात्रोत्सव मोठय़ा भक्तिभावाने पार पाडला जातो , येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
*

श्री योगेश्वरी अंबेजोगाई

ambajogai
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात अंबेजोगाई या तालुक्याचे गावात योगेश्वरीचे मंदिर आहे, विवेकसिंधू सारखा अजोड ग्रंथ लिहिणारे मराठी आद्यकवी मुकुंदराजांची ही कर्मभूमी. या शहराच्या मध्यभागी जयंती नदीच्या पश्‍चिम काठावर योगेश्‍वरीमातेचे भव्य मंदिर आहे. मंदिराच्या सभोवती दगडी तटबंदी असुन ती खोलेश्‍वरांनी बांधली आहे. पूर्वाभिमुख व उत्तराभिमुख महाद्वारा समोर दोन दीपमाळा आहेत. मुख्य मंदिर उत्तराभिमुख असून, मुख्य मंदिरासमोर लाकडी सभामंडप आहे. मध्यमागी यज्ञकुंड आहे.मंदिरास मध्यभागी उंच शिखर असुन त्याचे सभोवती चार छोटी शिखरे आहेत. या शिखरावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिरात ईस १२४७ चा शिलालेख असुन या मंदिराचा ईस १७२० मध्ये जीर्नोधार करण्यात आला.
गर्भगृहात एका चोथर्यावर श्री योगेश्वरी देवीचा भव्य तांदळा असून, तांदळ्यास तोंड, नाक,डोळे असे अवयव आहेत, तो शेंदूर चर्चित असुन तो अलंकृत करण्यात येतो.
योगेश्वरी देवीच्या स्थानासंदर्भात काही आख्यायिका आहेत. दंतासूर नामक दैत्याचा वध करण्यासाठी पार्वती देवीने घेतलेला अवतार म्हणजे योगेश्वरीचा अवतार असे मानतात.योगेश्वरी देवी विषयी अजून एक कथा असुन
ही देवी कुमारिका मानली जाते पार्वतीने ‘त्रिपुरसुंदरी’ नामक अवतार घेतला व कोकणातील हि मूळ देवता लग्नाच्या कारणाने ‘अंबेजोगाई’ येथे आली व तेथेच राहिली, तिचा परळी येथील वैजनाथ यांच्याशी विवाह निश्चित झाला होता. पण त्रिपुरसुंदरीला हे लग्न मान्य नव्हते, लग्नाच्या निमित्ताने त्रिपुरसुंदरी आणि सर्व वऱ्हाड ‘परळी’ गावाजवळ असणाऱ्या ‘अंबेजोगाई’ येथे वास्तव्याला आले. विवाहमुहूर्ताच्या वेळी मुहूर्त टाळला तरी ‘त्रिपुरसुंदरी’ आपल्या जागेवरच बसून राहिली. तिने ठामपणे विवाहास नकार दिला.
येथे महाकाली आणि तुळजाभवानीचे मूर्ती असुन मंडपात गणपती, केशवराज यांचे मूर्ती आहेत सर्वतीर्था जवळ सर्वेश्‍वर रुद्रभैरव, महारुद्र मंदिर व मायामोचन तीर्थ आहे.
मार्गशीर्ष शुद्ध पौणिर्मा हा देवीचा जन्मदिवस. त्यामुळे अंबेजोगाई येथील मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौणिर्मा असा नवरात्रौत्सव साजरा करतात, या नवरात्रोत्सवात पौणिर्मेला उत्सवमूतीर्ची पालखीतून मिरवणूक काढली जाते
शारदीय नवरात्रात काकड आरती, दुपारचा नैवैद्य व देवीला प्रसाद म्हणून विडा देण्याची प्रथा आहे. अष्टमीला शतचंडी हवन करण्याची प्रथा असून, नवमीला पूर्णाहूती दिली जाते. दसऱ्याला ‘अंबेजोगाई’ मंदिरातील उत्सव मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढली जाते. रात्री मिरवणूक पुन्हा देवळात आल्यावर प्रसादाचे वाटप होते.
*

श्री जीवदानी विरार

jivdani virar
महाराष्ट्राची राजधानी मुबई पासून जवळच असलेल्या विरार जवळ हे जीवदानी मंदिर आहे. हे मंदिर डोंगराचे कपारीत आहे. या डोंगराचे पायथ्याशी गणेश मंदिर आहे. येथून गडाची उंची सुमारे ९०० फूट असून गड चढून जाण्या साठी चौदाशे पायऱ्या आहेत. या डोंगरावर १७ व्या शतकात जीवधन नावाचा किल्ला होता. गडावर काही गुंफा खोदलेल्या होत्या आज तटाचे काही दगड भग्नावस्थेत येथे आढळतात. मराठ्यांच्या या किल्ल्यावर ईस १७३१ मध्ये इंग्रजांनी हल्ला केला त्यावेळी गडावर थोडेच सैन्य होते. म्हणून मराठे किल्ला सोडून पळून गेले. त्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा सर केला.
पूर्वी डोंगराचे कपारीत जीवदानी देवीचा एक तांदळा होता जुन्या काळी साधारणपणे १९४६ पर्यंत गुराखीच या शिळेची पूजा करत. त्यानंतर १९४६ ते १९५६ या काळात बारकीबाय नावाची भक्त तिथे नियमाने पूजा करू लागली. तिचे पुढाकारातून येथे देवीच्या भक्तांनी त्या रूपाला सुबक अशा संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. सध्या मंदिराच्या सभागृहाच्या खाली असलेल्या पठारावर सात मजली इमारत बांधण्यात आली आहे व मंदिराची मुळ कपार त्यात सामावून घेतली आहे. त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यासमोर पाच हजार फुटांचं सभागृह तयार झालं आहे. मुख्य मंदिरात दगडातच गाभारा करून तिथे देवीची मूर्ती बसवण्यात आली आहे. हि उभी असणारी मूर्ती उजव्या हाताने भक्तांना आशिर्वाद देत आहे. या स्थला विषयी लोककथा असुन
जुन्या काळी गडाच्या पायथ्याशी एका शेतकऱ्याच्या शेतात रोज एक गाय चरण्यासाठी येत होती . दिवसभर चरल्यानंतर सायंकाळी ती डोंगरमाथ्यावर निघून जायची. एकदा शेतकऱ्याने तिचा पाठलाग केला. डोंगरावरच्या एका मैदानात ती गाय थांबली आणि तिथे एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली. ती गाईची मालकीण असावी असं समजून शेतकऱ्यांने तिच्याकडे , आपल्या शेतात गाय चरते म्हणून पैशांची मागणी केली.
ती स्त्रीने शेतकऱ्याच्या हातावर पैसे ठेवत असतानाच शेतकऱ्यांने पैसे असल्याचं सांगितलं. मला पैसे देवू नकोस अशी विनंती त्याने करताक्षणीच ती तेजस्वी स्त्री नाहीशी झाली. तेवढ्यात त्या गाईने मोठा हंबरडा फोडून कड्यावरून खोल दरीत स्वत:ला झोकून दिलं. गाईच्या बलिदानाचं रहस्य तसेच राहिले .गाईने जीवाचं दान केलं म्हणून त्या डोंगराला ‘ जीवदानीचा डोंगर ‘ आणि डोंगरावर वास्तव करणारी ती अज्ञात देवता जीवदानी म्हणून प्रसिद्ध झाली. गाईने जिथून उडी घेतली तिथे एक तांदळा ठेवला गेला व तिचे पूजन सुरु झाले.
मंदिराच्या परिसरात अनेक गुंफा आहेंत त्यात कालिकामाता , भैरवनाथ , बारोंडा देवीची मंदिरं आहेत. शेजारीच मानकुंड नावाची पाण्याची कुंडं आहेत. या डोंगरावरून विरार परिसराचं विहंगम दृश्य दिसतं. डोंगरावरून खालील पापडखिंड धरणाच्या परिसरात जीवदानी देवीची बहिण बारोंडा देवीचं व महादेवाचं मंदिर आहे.
*

श्री येडेश्वरी देवी येरमाळा

yermala
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येरमाळा हे गाव राज्यमहामार्गावर बालाघाटाच्या कुशील वसले आहे. येथे येडेश्वरी देवीचे मंदिर गावच्या दक्षिण बाजूस ४०० फूट डोंगर रांगेत डोंगर माथ्यावर असून या मंदिरात जाण्यासाठी ४०० ते ४५० पाय-याचा पायरी मार्ग आहे. चढून वर गेल्यानंतरच पुरातन दगडी बांधकाम आसलेल्या मंदिराच्या आतमध्ये तीन-चार फूट व्यास असलेला देवीचा शेंदूर चर्चित तांदळा आहे. देवीला ;डोक्यावर मुकूट, नाकात नथ, गळ्यात माळ अशा अलंकाराने नटविले जाते.
देवीसमोर पुत्र परशुरामाची चांदीची मूर्ती आहे. मदिराच्या बाहेरील आवारात देवी मातंगी, हवन होम, श्री गणेश, श्री दत्त, महादेव आणि काळभैरवनाथांचे छोटी मंदिरे आहेत. या देवी विषयी एक आख्यायिका असुन
प्रभू राम सितेच्या शोधात या भागात भटकंती करीत असताना देवी पार्वतीने येथे आलेल्या रामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण करुन येताच रामाने तू माझी सीता नसून माझी व्याकुळता पाहून सितेचे रुप धारण केलेली तू तू माझी वेडी आई आहेस असे म्हटले. यामुळे देवीस वेडाई या नावाने ओळखले जाते.
या स्थाना विषयी अजुन एक सत्य कथा असुन हे स्थान माहूरचे रेणुकेचे मानले जाते येथील आबाजी पाटलांचे कुलदैवत माहूर गडची रेणुका देवी होती त्यांना माहूरचे रेणुका देवीला वारंवार जाणे शक्य होत नसल्यामुळे त्यांनी येरमाळा येथे डोंगरावरच माहूरगडाप्रमाणे देवीचे मंदिर बांधले व येथे देवीची स्थापना केली
या मदिराच्या बाहेरील आवारात मातंगी, होमकुंड , गणेश, दत्त महादेव आणि भैरवनाथ यांची छोटी मंदिरे आहेत. मंदिरात पाच दीपमाळा असुनमंदिराच्या मागील डोंगरावर तुळजाभवानी मातेचे मंदिर व एक दिपमाळ आहे.
श्री येडेश्वर देवी दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भक्तगण नवरात्र व नारळी पौर्णिमा,चैत्र पौर्णिमा या दिवशी मोठया प्रमाणात येतात.
*

श्री मोहटादेवी मोहटा

mohatadevi
अहमद नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटा हे ठिकाण पाथर्डीपासून आग्नेय दिशेला नऊ किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर आहे. हे रेणुका देवीचे
स्थान असून मोहटे गावाच्या हद्दीत असल्याने मोहोटादेवी असे नाव पडले. मराठवाडा व नगर जिल्ह्याच्या हद्दीवर गर्भगिरी डोंगराची रांग बीड जिल्ह्यात गेली आहे. या रंगे मध्ये हे मंदिर आहे मंदिराकडे डोंगरावर जाण्यासाठी पायरी व वाहन मार्ग आहेत.
आधुनिक बांधकामांनी येथील मंदिराचे स्वरुप बदलून गेले आहे. तरी मूळ मंदिर मात्र तसेच आहे गर्भगृहात देवीचा पूर्वाभिमुख तांदळा आहे. हे रेणुकेचे स्थान मानले जाते. मोहटे येथील दहिफळे घराण्यातील देवी भक्ताला स्वप्न दृष्टांताप्रमाणे येथे देवीचा तांदळा सापडला, देवी आपल्या भक्ता साठी माहुर वरून येथे आली व तिने येथेच वास केला, हा दिवस अश्विन शुद्ध एकादशीचा होता त्या मुळे मोहट्याला एकादशीला यात्रा उत्सव संपन्न होतो.
*

देवी आरती, मंत्र, स्तोत्र,

श्री दुर्गेची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी Iअनाथनाथे अंबे करुणा विस्तारी I
वारी वारी जन्म मरान्ते वारी Iहारी पडलो आता संकट निवारी I१I
जय देवी जय देवी महिषा सुर्मार्दिनीIसुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी !ध्रुI
तुजवीन भुवनी पाहता तुज ऐसे नाही Iचारी श्रमले परंतु न बोलवे काही I
साही विवाद करिता पडिले प्रवाहीIते तू भक्तालागी पावसी लवलाही I२I
प्रसन्ना वदने प्रसन्ना होसी निजदासा Iक्लेशापासुनी सोडीवी तोडी भवपाशा I
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशाIनरहरी तल्लीन झाला पद्पान्काज्लेषा I३I
जय देवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी!सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी|४|

श्री महालक्ष्मीची आरती

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता ।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता ।
सहस्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां ।। १ ।।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ।
झळके हाटक-वाटी पीयुषरसपाणी ॥
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिकरवदना राजस मदनाची जननी ।। २ ।।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
ताराशक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं ।
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रकटे पद्मावती निजधर्माचारी ।। ३ ।।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

श्री यमाई देवीची आरती

जय देवी जय देवी जय आदिशक्ती
आरती ओवाळू एकाग्र भक्ती ॥
निर्गुण जे होते सगुणत्वा आले
चराचर हे सकळीक तुज पासोनी झाले
माया वेष्टित जग हे सगुण तवा केले
त्रैलोक्य सत्य असुनीही झाले ॥
एसी सगुण तुजला लेणी कांचन जडिताची
अनेक वस्त्रे शोभती कांचन भरिताची
बैसुनी सिंहासनी ;नृत्ये गणिकांची
पाहशी तू नयनी जननी जगताची ||
हरिहर ब्रह्मादिक येती नमनासी
जे जे वर मागती ते ते त्या देशी
कृपाळू अंबे माते पालन भक्तासी
परशुरामा दिना करुणाकर होसी ||मंगळागौरीची आरती
ओंवाळू आरतीला. l मंगलगौरी तुजला l
पाहुनिया रूप तुझे l मोदं मना झाला ll
श्रवण मंगळ्वारीं l जमुं सगळ्या आम्हीं नारी l
शोभवुनि स्थानासि l पूजूंया गौरीसि ll
सुगंधी सुमनें हीं l वाहूंया तिजला ll १ ll
वाहूनि हळदीकुंकु l सौभाग्यासी मागूं l
पोडश परिची पत्रीं l घेउनिया सत्पात्रीं ll
प्रेमाने भक्तिनें l अर्पूंया तिजला l
ओंवाळू आरतीला l मंगलगौरी तुजला ll २ ll
पंचारती ओवाळू l नैवेधासि समर्पूं l
जमूनि ग मैत्रिणी या l खेळू खेळाला ll
आनंदें प्रतिवर्षी, येईं गृहां आमुच्या l
ओंवाळू आरतीला. ll ३ ll

!! श्री महालक्ष्मी प्रसन्न !!

नमस्ते स्तू महामाये श्रीपिथे सुरपूजिते ||
शंख चक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमो $स्तुते ||१||
नमस्ते गरुडा रूढे कोलासुर भायाग्कारी ||
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमो $स्तुते ||२||
सर्वज्ञे सर्व वराडे सराव दुस्त भायाग्कारी ||
सर्व दुक्ख हरे देवी महालक्ष्मी नमो $स्तुते ||३||
सिद्धीबुद्धी प्रदे देवी भुक्तिमुक्ती प्रदायेनी ||
मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमो $स्तुते ||४||
आद्यंत रहिते देवी आद्य शक्ती महेस्वरी ||
योगाजे योग्साम्भूते महालक्ष्मी नमो $स्तुते ||५||
स्थूल सूक्ष्म महारावद्रे महासक्ती महोदरे ||
महा पाप हरे देवी महालक्ष्मी नमो $स्तुते ||६||
पद्मासानास स्थिते देवी पराब्ब्राम्हा स्वरूपिणी ||
पर्मेशी जगन मत r महालक्ष्मी नमो $स्तुते ||७ ||
स्वेताम्बर धरे देवी नानालंकार भूषिते ||
जगात स्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमो $स्तुते ||८||

महिषासुरमर्दिनिस्तोत्रम्

अयि गिरिनंदिनि नंदितमेदिनि विश्वविनोदिनि नंदनुते
गिरिवर विंध्य शिरोधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुंबिनि भूरि कुटुंबिनि भूरि कृते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१॥
सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शंकरतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते ।
दनुज निरोषिणि दितिसुत रोषिणि दुर्मद शोषिणि सिन्धुसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥२॥
अयि जगदंब मदंब कदंब वनप्रिय वासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शृंग निजालय मध्यगते ।
मधु मधुरे मधु कैटभ गंजिनि कैटभ भंजिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥३॥
अयि जगदंब मदंब कदंब वनप्रिय वासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शृंग निजालय मध्यगते ।
मधु मधुरे मधु कैटभ गंजिनि कैटभ भंजिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥३॥
अयि रण दुर्मद शत्रु वधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते
चतुर विचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते ।
दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतांतमते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥५॥
अयि शरणागत वैरि वधूवर वीर वराभय दायकरे
त्रिभुवन मस्तक शूल विरोधि शिरोधि कृतामल शूलकरे ।
दुमिदुमि तामर दुंदुभिनाद महो मुखरीकृत तिग्मकरे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥६॥
अयि निज हुँकृति मात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्र शते
समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीज लते ।
शिव शिव शुंभ निशुंभ महाहव तर्पित भूत पिशाचरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥७॥
धनुरनु संग रणक्षणसंग परिस्फुर दंग नटत्कटके
कनक पिशंग पृषत्क निषंग रसद्भट शृंग हतावटुके ।
कृत चतुरङ्ग बलक्षिति रङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥८॥
जय जय जप्य जयेजय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते
झण झण झिञ्जिमि झिंकृत नूपुर सिंजित मोहित भूतपते ।
नटित नटार्ध नटीनट नायक नाटित नाट्य सुगानरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥९॥
अयि सुमनः सुमनः सुमनः सुमनः सुमनोहर कांतियुते
श्रित रजनी रजनी रजनी रजनी रजनीकर वक्त्रवृते ।
सुनयन विभ्रमर भ्रमर भ्रमर भ्रमर भ्रमराधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१०॥
सहित महाहव मल्लम तल्लिक मल्लित रल्लक मल्लरते
विरचित वल्लिक पल्लिक मल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्ग वृते ।
सितकृत पुल्लिसमुल्ल सितारुण तल्लज पल्लव सल्ललिते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥११॥
अविरल गण्ड गलन्मद मेदुर मत्त मतङ्गज राजपते
त्रिभुवन भूषण भूत कलानिधि रूप पयोनिधि राजसुते ।
अयि सुद तीजन लालसमानस मोहन मन्मथ राजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१२॥
कमल दलामल कोमल कांति कलाकलितामल भाललते
सकल विलास कलानिलयक्रम केलि चलत्कल हंस कुले ।
अलिकुल सङ्कुल कुवलय मण्डल मौलिमिलद्भकुलालि कुले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१३॥
कर मुरली रव वीजित कूजित लज्जित कोकिल मञ्जुमते
मिलित पुलिन्द मनोहर गुञ्जित रंजितशैल निकुञ्जगते ।
निजगुण भूत महाशबरीगण सद्गुण संभृत केलितले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१४॥

देवी सूक्तम

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥१॥
रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः ।
ज्योत्स्ना यै चेन्दुरुपिण्यै सुखायै सततं नमः ॥२॥
कल्याण्यै प्रणतां वृध्दै सिध्दयै कुर्मो नमो नमः ।
नैऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः ॥३॥
दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ।
ख्यातै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः ॥४॥
अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः ।
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः ॥५॥
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शाध्दिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥६॥
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥७॥
या देवी सर्वभूतेषु बुध्दिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥८॥
या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥९॥
या देवी सर्वभूतेषु क्षुधारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१०॥
या देवी सर्वभूतेषु छायारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥११॥
या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१२॥
या देवी सर्वभूतेषु तृष्णारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१३॥
या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१४॥
या देवी सर्वभूतेषु जातिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१५॥
या देवी सर्वभूतेषु लज्जारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१६॥
या देवी सर्वभूतेषु शान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१७॥
या देवी सर्वभूतेषु श्रध्दारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१८॥
या देवी सर्वभूतेषु कान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१९॥
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२०॥
या देवी सर्वभूतेषु वृत्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२१॥
या देवी सर्वभूतेषु स्मृतिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२२॥
या देवी सर्वभूतेषु दयारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२३॥
या देवी सर्वभूतेषु तुष्टिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२४॥
या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२५॥
या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२६॥
इंद्रियाणामधिष्ठात्री भूतानं चाखिलेषु या ।
भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः ॥२७॥
चितिरुपेण या कृत्सनमेद्वयाप्य स्थिता जगत् ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२८॥
स्तुता सुरैः पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता ।
करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्याभिहन्तु चापदः ॥२९॥
या सांप्रतं चोध्दतदैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते ।
या च तत्क्षणमेव हन्ति नः सर्वापदो भक्ति विनम्रमूर्तिभिः ॥३०॥
गुह्यातिगुह्यगोप्त्री त्वं गृहाणास्तत्कृतं जपम् ।
सिध्दिर्भवतु मे देवि त्वत्प्रसादान्महेश्वरि ॥३१॥
इति देवीसूक्तम् समाप्तम् ।

श्रीसूक्तम्

ॐ हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्॥२॥
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवी जुषताम्॥३॥
कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्।
पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वयेश्रियम्॥४॥
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियंलोके देव जुष्टामुदाराम्।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥५॥
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्व:।
तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी:॥६॥
उपैतु मां देवसख: कीर्तिश्चमणिना सह।
प्रादुर्भुतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृध्दिं ददातु मे॥७॥
क्षुत्पपासामलां जेष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम्।
अभूतिमसमृध्दिं च सर्वानिर्णुद मे गृहात॥८॥
गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्।
ईश्वरिं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम्॥९॥
मनस: काममाकूतिं वाच: सत्यमशीमहि।
पशूनां रूपमन्नस्य मयि श्री: श्रेयतां यश:॥१०॥
कर्दमेनप्रजाभूता मयिसंभवकर्दम।
श्रियं वासयमेकुले मातरं पद्ममालिनीम्॥११॥
आप स्रजन्तु सिग्धानि चिक्लीत वस मे गृहे।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले॥१२॥
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टि पिङ्गलां पद्ममालिनीम्।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१३॥
आर्द्रां य: करिणीं यष्टीं सुवर्णां हेममालिनीम्।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह॥१४॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम्॥१५॥
य: शुचि: प्रयतोभूत्वा जुहुयाादाज्यमन्वहम्।
सूक्तं पञ्चदशर्च च श्रीकाम: सततं जपेत्॥१६॥
पद्मानने पद्मउरू पद्माक्षि पद्मसंभवे।
तन्मे भजसि पद्मक्षि येन सौख्यं लभाम्यहम्॥१७॥
अश्वदायै गोदायै धनदायै महाधने।
धनं मे लभतां देवि सर्वकामांश्च देहि मे॥१८॥
पद्मानने पद्मविपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि।
विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधस्त्वं॥१९॥
पुत्रपौत्रं धनंधान्यं हस्ताश्वादिगवेरथम्।
प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे॥२०॥
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसु।
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरूणं धनमस्तु मे॥२१॥
वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृतहा।
सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिन:॥२२॥
न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभामति:।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्॥२३॥
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांसुकगन्धमाल्यशोभे।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीदमह्यम्॥२४॥
विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवप्रियाम्।
लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम्॥२५॥
महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि।
तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्॥२६॥
श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते।
धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायु:॥२७॥
॥इति श्रीसूक्तं समाप्तम॥

 

याविभागातील काम सुरु आहे लवकरच पूर्णत्वाने भेटू


Comments are closed.