खंडोबाचे अवतार स्थान कडेपठार मंदिर, मंदिराचे मार्गावरील देवता, मंदिर यांचे माहिती सह सचित्र दर्शन
जेजुरी गावातून जाणारा रस्ता जेजुरीगडा वरून जाणारा रस्ता कडेपठार दर्शन कडेपठार मंदिर कडेपठार परिसर
जेजुरी नगरी व गडाचे नेरुत्य दिशेस कडेपठार हे खंडोबाचे मुळ स्थान आहे. ते 18°15’12″N 74°8’59″E वर वसलेले असून समुद्र सपाटी पासून ९९२ मीटर उंची वर व जेजुरी गावा पासून २५९ मीटर उंच आहे. जेजुरी जवळ आले की ही डोंगर रांग दिसते, कडेपठारी जाण्यासाठी जेजुरीगडा वरून व पायथ्या पासून असे दोन मार्ग आहेंत.
जेजुरी मधील चिंचचें बागे पासून गाडी रस्त्याने कडेपठारचें पायथ्याला पोहचता येते, तेथून पुढे पायरी मार्गाने चढावे लागते
*
जेजुरी गावातून सुमारे १.५ किमी. गाडी रस्त्याने विझाळा पर्यंत पोहचता येते.कडेपठार हे खंडोबाचे अवताराचे मुळस्थान. जेजुरीगडाचे पूर्वी पासून हे स्थान आहे. कडेपठार जेजुरी गावापासून सुमारे ४०० फुट उंचीवर आहे. या परिसरात जुन्या काळी वीज पडून झरा उत्पन झाला होता. म्हणून या परिसरास विझाळा म्हणतात. येथे पायथ्याला एक शंकराची मूर्ती असून शेजारील कमानी मधून पायरी मार्गास सुरवात होते
>
या रस्त्यावर सुमारे ७५० पायरी आहे. जुन्याकाळी हा पायरी मार्ग नव्हता, डोंगरातील पायवाटेने चढावे लागत असे, अलीकडे कडेपठार ट्रस्टने भाविकांचे देणग्या मधून हा पायरी मार्ग उभारला. काही टप्पे पार करून गेले वर रस्त्याचे पश्चिम बाजूस एक घोडेउड्डाणाचे स्थान आहे. पुढील चढण पारकरून थाप्यावर पोहचता येते.
रस्त्याचे पूर्व बाजूस एका पश्चिमाभिमुख डोंगरकपारीत बानुबाईचे स्थान आहे बाणाई हि खंडोबाची दुसरी बायको हि धनगर समाज्याची असल्याचे मानले जाते, तर काही कथा मध्ये ती धनगरांनी संभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात, ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचे हि मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेउन तीच्याघरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला, आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. या दुसरया विवाहामुळे सवतीमध्ये विवाद होऊ लागले म्हणून खंडोबाने बाणाईला निम्या गडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला. रोज मध्यरात्री नंतर खंडोबा बाणाईच्या भेटीस येत असत अशी जनश्रुती आहे. येथून पुढे थोडे चढले कि हा रस्ता जेजुरीगडा वरून कडेपठारी आलेल्या रस्त्याला मिळतो.
*
जेजुरी गडाच्या मागील बाजूचे रस्त्याने हि येथे पोहचता येते.
गडकोटाचे नेर्रूय्तेस दिसतो तो डोंगर माथ्यावरून जाणारा कडेपठारचा रस्ता.या रस्त्याने डोंगर चढणीचे सुमारे २.७ किमी. चालून येथे पोहोचता येते.
गडाचे मागील विहिरी पासून पुढे गेले कि उत्तर दिशेस एक टेकडीवर जाणारा रस्ता दिसतो, टेकडीवर एक चोथरा असून दसऱ्याला शिलांगनास निघालेली पालखी येथे विसाव्यास थांबते. टेकडीच्या पूर्वेकडून जाणारे रस्त्याने पुढे दोन टेकडी मधील लवणात पोहोचतो
येथे हि एक चोथरा आहे. हा सुद्धा पालखीचा विसावा. येथून पूर्वेकडून जाणारा रस्ता रमण्यात जातो. पश्चिमे कडील चढणीचा रस्ता कडेपठारी जातो.
चढण संपली कि सपाटीचा रस्ता लागतो येथे रस्त्याचे दोन्ही बाजूस दगडी वास्तूचे भग्न अवशेष आहेत. काही देवड्या मध्ये पादुका आहेंत.
समोर थोडे चढणीवर वेस आहे. या मार्गावर जुन्याकाळी ७ वेस असल्याचा उल्लेख आढळतो. आता फक्त तीनच वेस आहेंत.
पुढे लाल मातीच्या टेकडीचा परिसर लागतो येथून मागे वळून पहिले कि जेजुरीचा संपूर्ण परिसर दिसतो
पूर्वेस रमणादरी कडे खाली एका टोकावर एका लहान दगडावर एक मोठी शिळा दिसते, या विषयी अनेंक दंतकथा प्रचलित आहेत काही जण या सासू सुना असून सुनेचे पाठीवर सासू बसली आहे असे म्हणतात. काहीचे मते या भांडणे करणाऱ्या सवती आहेत, काही यांना म्हाळसा बानुचे भांडणे म्हणतात. एका नेसर्गिक रचणे बदलच्या या कथा मनोरंजकच
पुढे चढण लागते तिचे मध्यावर इक पडकी ओवारी आहे. तीच्ये शेजारून पुढे जाता येते.
समोर एक वेस असून तिला सलग्न पूर्वेला एक उत्तराभिमुख ओवरी आहे भक्तांच्या विसाव्याची केलेली हि व्यवस्था.
वेसी मधून थोडे पुढे जाऊन मागे वळून पहिले कि जेजुरी गड व मल्हारसागराचे विहंगम दृष दिसते
काही अंतर पुढे गेले कि पायरी मार्ग सुरु होतो
पुढे चोथारा दिसतो तो दसऱ्याचे दिवशी शिलांगना वरून येणारे कडेपठार पालखीचा विसावा पूर्वेकडील रस्त्याने येवून येथे पालखी विसावते. पश्चिमे कडील पायरी मार्ग कडेपठारकडे जातो.
या पायरी मार्गावर पश्चिम बाजूस एक पाण्याचे टाके आहे. समोरच डोंगराचे कपारीस पश्चिमाभिमुख देवडी आहे ती बाणाईची. बाणाई हि खंडोबाची दुसरी बायको हि धनगर समाज्याची असल्याचे मानले जाते, तर काही कथा मध्ये ती धनगरांनी संभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात, ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचे हि मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेउन तीच्याघरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला, आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. या दुसरया विवाहामुळे सवतीमध्ये विवाद होऊ लागले म्हणून खंडोबाने बाणाईला निम्या गडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला. रोज मध्यरात्री नंतर खंडोबा बाणाईच्या भेटीस येत असत अशी जनश्रुती आहे.
पुढे एक चोथरा लागतो तो कडेपठार पालखीचा दसरा शिलांगनासाठी जातानाचा विसावा. येथील पूर्व बाजूचा रस्ता शिलांगनाचे जागे कडे जातो. पश्चिमेकडील रस्त्याने वेसी मधून कडेपठार कडे जाता येते.
पुढे सपाटीचा रस्ता लागतो या रस्त्याचे दोन्ही बाजूना काही देवड्या लागतात. दक्षिणे कडील डोंगरावर कडेपठारचे मंदिर दिसते .व मध्ये जानाईदरा परिसर दिसतो.पुढे एक सुळका दिसतो हि सुसरटेंगी.सुळक्यावर एक चोथरा दिसतो तो कडेपठार पालखीचा दसरा शिलांगनासाठी जातानाचा विसावा या सुळक्याचे दक्षिणे कडून पुढे जाता येते.
सुसरटेंगी च्या पुढे आले कि येथे उत्तरे कडून विझाळा परिसरातून येणारा पायरी मार्ग हि येथे येवून मिळतो.
*
कडेपठार दर्शन.
जेजुरीगडा वरून व विझाळ्या मधून आलेले दोनही रस्ते जिथे मिळतात. तिथेच समोर कडेपठार कडे जाणारे दोन रस्ते फुटतात. पश्चिमेकडील चढणीचे रस्त्याने काही मंदिरे लागतात.
चढून वर गेले कि समोर पूर्वाभिमुख देवूळ दिसते ते हेगडी प्रधानाचे. हेगडीप्रधान हा गंगा जमनी शब्द असून कन्नड मध्ये हेगडी या शब्दाचा अर्थ प्रधान असाच होतो. मार्तंड मल्लासुर युद्धात विष्णूनी मार्तंडाचे प्रधान बनून युद्ध केले होते. त्यामुळे हेगडीप्रधान हा विष्णूचा अवतार मानला जातो. खंडोबाने बाणाईच्या रक्षणासाठी येथे हेगडीप्रधानाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. जनश्रुती नुसार हेगडीप्रधान हा बाणाईचा भाऊ होता व बाणाई विवाहा नंतर तो खंडोबाचा प्रधान बनल्याचे सांगतात. या मंदिरात हेगडी च्या दोन मूर्ती आहेंत.
या मंदिराचे पुढे पूर्वाभिमुख दुसरे देवूळ दिसते तो भगवानगिरीचा मठ. या मठात दोन समाधी असून मागील समाधी भगवानगिरी यांची असून पुढील समाधी त्यांची शिष्या ज्वालागिरी हिची आहे. भगवानगिरी हे सिद्धपुरुष होते. त्यांचे चमत्काराचे अनेक दंतकथा सांगितल्या जातात.
पुढे खालून आलेला रस्ता इथे मिळतो. येथे पूर्वभिमुख मंदिर आहे ते साक्ष विनायकाचे.
पार्वतीने आपली दासी जया हिस शंकराचे पुढील अवतारात, शंकराच्या पत्नीत्वाचा भाग देण्याचे वचन शंकर व गंगेच्या उपस्थितीत दिले होते. त्यास गणपती साक्ष होता पुढे खंडोबा अवतारात बाणाईचे रुपात शंकराने जयेस वरले. पण म्हाळसा अवतारातील पार्वतीने क्रोध प्रगट केला. तेव्हा गणपती साक्ष देण्यास आला, पण म्हाळसाने हि साक्ष नाकारली. पुढे विवाद मिटलेवर खंडोबाने आपल्या दर्शनास आलेल्या भक्ताची साक्ष ठेवण्याचे काम गणपतीवर सोपवले, तो हा साक्षविनायक. खंडोबाचे दर्शन घेतल्यावर साक्ष विनायकाचे दर्शना शिवाय खंडोबाचे दर्शन पूर्ण होत नाही असे मानले जाते
पुढे मंदिराकडे निघाले वर रस्त्यापासून पश्चिमेस थोड्या अंतरावर डोंगराचे कडेस एक शेंदूरचर्चित शिळा दिसते ती विरभद्राची. विरभद्र हा क्षेत्रपाल श्रेणी मधील देव, तो शंकरांचा अवतार मानला जातो. खंडोबाचे मनिमल्लासुरा बरोबरील युद्धात मल्ल सेनापती सुरेंद्रवर्धन व देत्यशेल् यांनी केलेली चक्राव्युह रचना भेदून त्यांचा वध करून विजय मिळवणारे विरभद्राची यथे स्थापना केलेली आहे.
रस्त्याचे पुर्वबाजूस कमानी जवळ नाग प्रतिमा आहे.
पश्चिमेस पूर्वाभिमुख राममंदिर आहे. तीन कमानी सदर व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. हे मंदिर इस. १७९० मध्ये उभारण्यात आले. गर्भगृहात राम, लक्ष्मन सीता यांचे प्रतिमा व एक द्वीलिंग आहे. मंदिरा समोर एका मेघदंबरीत हनुमान प्रतिमा आहे.
पुढे मंदिरा कडे जाताना एका पश्चिमाभिमुख देवडीत वाघजाईची मूर्ती आहे.तिचे देवडी शेजारी दक्षिणेस एका छोट्या कोनाड्यात खोकलाईचा तांदळा आहे.
या रस्त्याने आपण कडेपठार मंदिराचे मागील बाजूस पोहोचतो. जुन्याकाळी या मंदिरा भोवती आतून ओवऱ्या असणारा दगडी कोट होता. असे तेथील अवशेषा वरून दिसते. मंदिराचे उत्तर बाजूने पुढे गेले कि एका दगडी पश्चिमाभिमुख मेघदंबरीत नंदी प्रतिमा आहेंत. यांचे मागे पूर्वदरवाजा आहे.
*
समोर खंडोबाचे मुख्य मंदिर दिसते. मंदिर व नंदी मेघदंबरी मध्ये सुमारे २० फुट व्यासाचे दगडी कासव आहे. मंदिराची रचना तीन कमानी सदर, मंडप, गर्भगृह अशी आहे. मंडपाचे प्रवेशद्वारावर जय विजय प्रतिमा आहेंत. मंडपात एक दगडी कासव व धातूची श्वान प्रतिमा आहे
मंडपातील दरवाजातून आपण गर्भगृहात प्रवेश करतो. गर्भगृहात एका आयताकृती योनीत खंडोबा व म्हाळसा यांची द्वीलिंग आहेंत. यांच्या पाठीमागे धातूचे नाग, कुत्रा इत्यादी प्रतिमा आहेंत. या प्रतिमाचे मागे खंडोबा म्हाळसा यांच्या उत्सव मूर्ती आहेंत. या मूर्तीचे उत्तरेस संगमरवरी गणेश प्रतिमा आहे. तर दक्षिण बाजूस नव्याने बसवलेली मार्तंड प्रतिमा आहे. पाठीमागे देवळीत बसलेली सुमारे ३ फुट उंच व २ फुट रुंद असलेली मार्तंड भैरवाची चतुर्भुज दगडी प्रतिमा आहे. तिचे आसनावर मणि व मल्ल यांची नरमुंड कोरलेली आहेंत. मार्तंडाचे दोन्ही बाजूस त्याचे पत्नीचे उभ्या प्रतिमा आहेत. हे खंडोबाचे अवताराचे मुळ ठिकाण यथेच शंकरानी मार्तंड अवतार धारण केला. अशी मान्यता आहे. हे मंदिर खूप प्राचीन मानले जाते.
मंदिराचे समोरील नंदी मंडपाचे दक्षिण बाजूस दत्त मंदिर आहे. या मंदिरात अनेक मूर्ती आहेंत. या मूर्ती समोर गोविंदबाबांची समाधी आहे. गोविंदबाबा हे योगी होते. इस १८२० मध्ये गोविंदबाबांनी येथे दत्त मूर्तीची स्थापना केली. व इस १८६२ मध्ये या मठाचे काम पूर्ण झाले. गोविंदबाबा इस १८६२ मध्ये समाधिस्त झाले. याच परिसरात खंडोबा विषयक ‘मार्तंड विजय’ हा ग्रंथ गंगाधर कमलाकर यांनी आपल्या सिद्धहस्ताने पूर्ण केला.
पुर्वद्वाराने बाहेर पडले कि काही अंतरावर एक विहीर आणि तलाव आहे. या तलावाचे परिसरात लक्ष्मिआई व वेताळ यांची स्थाने असलेचे सांगतात
तलावाकडून परतताना अनेंक वास्तु चे भग्न अवशेष दिसतात.
या अवशेषाचे उत्तर दिशेस एका उत्तराभिमुख देवडीत एक समाधी आहे ती लक्ष्मनबाबांची ते हुमनाबादचे माणिकप्रभू चे शिष्य होते. त्याच्या चमत्काराच्या अनेक दंतकथा लोक सांगतात या समाधी परिसरात त्यांचे शिष्याचे काही समाधी आहेंत.
पूर्व दरवाजाचे समोरच एका दगडी चोथरा असून त्याचे मधोमध उभा केलेला सुमारे ३० फुट उंचीचा लाकडी खांब दिसतो तो बागडाचा. या बगाडावर भक्तगण गळ टोचून घेत असत, इंग्रजी U आकाराचा हा गळ पाठीच्या कण्याच्या दोन्ही मांसल बाजू मध्ये अडकवला जात व त्याचे आधारे बगाडावरील आडव्या लाकडाला टांगून गोल फिरवले जात असे, नवसपूर्तीसाठी अशी कृती केली जात होती तर कधी आपल्या मधील इश्वरी सामर्थ दाखवण्यासाठी. गळ टोचलेली माणसे देवाचे योग्यतेची मानली जात व लोक त्यांचे कडे भक्तिभावाने पहात. देवासाठी आपण जेवढे जास्त यातना भोगतो तेवढे आपण देवा जवळ जातो अशीही लोकभावना होती. इस १८५६ मध्ये इंग्रजानी बगाडावर बंदी घातली आणि हि प्रथा बंद झाली.
पूर्व दरवाजाचे उत्तरबाजूस दरवाजा जवळच यशवंतरावची स्थापना केलेली आहे. या दरवाजा वर नगारखाना आहे.
पूर्व दरवाजा मधून आत आले कि उत्तरेस दिसतो तो उत्तरदरवाजा हा दरवाजा भग्न अवस्थेत आपल्या पुर्व वैभवाची साक्ष म्हणून उभा आहे.
मंदिराच्या दक्षिण बाजूस दक्षिणदरवाजा आहे. येथे बाहेर काही मंदिरे आहेंत. कडेपठार चे पठार सुमारे ११.५ एकर आहे
दक्षिणेस पुर्व बाजूस डोंगराचे कडेवर घोडेउड्डाण आहे. मार्तंडानी येथूनच युद्ध साठी दक्षिणेस प्रस्थान केले असे मानले जाते.
घोडेउड्डाणचे पश्चिमेस एक पुर्वभिमुख देवडी आहे ती सटवाई देवी ची.
पश्चिमेस काही अंतरावर एक छोटा मंडप असलेली पुर्वभिमुख देवडी आहे. या देवडीत काळभेरव व भवानीची मूर्ती आहे. या देवडीस तुकाईची देवडी म्हणतात. पश्चिमेस काही अंतरावर पुर्वभिमुख देवडी आहे. येथे भुलेश्वराची स्थापना केलेली आहे.
कोटाचे पश्चिम बाजूच्या पुर्वभिमुख ओवरीत भांडारगृह आहे. येथे नवरात्र व षडरात्र उत्सवात मूर्तीची स्थापना केली जाते.येथील शेजारचे ओवरीत अश्वरूढ खंडोबाची मूर्ती आहे.
या ओवरीच्या मागे पश्चिमेस उत्तर बाजूस पुर्वभिमुख पंचलिंग मंदिर आहे. या मंदिराची रचना तीन कमानी सदर व गर्भगृह अशी असून गर्भगृहात पंचलिंग व गणपती ची मूर्ती आहे. मूलत: शंकर हि देवता पंचमुख असल्याचे मानले जाते, त्याचीच हि स्थापना. या पंचलिंग दर्शनाने नीलाद्री, काशी, मातापूर, हरिद्वार,व जयाद्री यांच्या दर्शनाचे पुण्य मिळते व मुक्ती प्राप्त होते असे मानले जाते.
*
कडेपठार परिसर.
पंचलिंग मंदिराच्य मागील खोल दरीत दूरवर दिसते ते वाघेश्वरी चे मंदिर येथे कडेपठारचे मागील बाजूने उतरून किवा विझाळा चे पश्चिमे कडील कवडदरी मधून चढून खेसोबाचे स्थानापासून कवडखिंडी मधून उत्तरून जाता येते.
कडेपठारचे दरीत जानाईचे पुर्वभिमुख मंदिर आहे. कडेपठारचे उत्तरे कडील गंगाधर कड्यावरून उतरून दरीत जातायेते. या रस्त्याने उतरताना काही अंतराने पूर्वे कडे रस्ता फुटतो या रस्त्याला एक गुहा आहे. पेशवे तलावा जवळून रमणा परिसरातील डोंगर चढून या दरीत उतरून जाता येते. दरीत एक गोमुख हि आहे. मंदिराचे जवळ विहीर असून तिला जननी तीर्थ म्हणतात.