सातारे
सातारे खंडोबा साठी प्रसिद्ध असणारे संभाजीनगर जवळील गाव येथील रेल्वे स्टेशन पासुन ५ किमी असणारा गाव संभाजीनगरचे शहर विस्ताराने त्याचाच एक भाग बनत आहे. औरंगाबादचे रिंग रोडला पुणे, पैठण, बीड कडून येणारे मार्ग मिळतात त्या परिसरातील एम आई टी कॉलेज चे जवळून पाठीमागे जाणाऱ्या रस्त्याने सातारे येथे पोहचता येते.
येथील खंडोबा मंदिर एका डोंगराचे पायथ्याशी आहे गाडी मार्गाने मंदिराचे पुर्व व पश्चिम दरवाज्या मध्ये पोहचता येते. मंदिर एका उंच कट्यावर बांधलेले आहे आवाराचा पुर्व दरवाजा मोठा असुन सुमारे १५ पायऱ्या चढून दरवाज्यातून आवारात जाता येते दरवाज्यावर नगारखाना आहे
पुर्व दरवाज्यातून आवारात प्रवेश केल्यावर उत्तर बाजुस एक दीपमाळ आहे त्याचे पुढे पूर्वाभिमुख मंदिराच्या मंडपाचा चौथरा दिसतो तीन पायऱ्या चढून चौथऱ्यावर जाता येते. चौथऱ्यावर चारही बाजुच्या भिंतीचा तळ व मंडपाचे खांबांचे १९ तळ या चौथऱ्यावर दिसतात, या चौथऱ्यावर येण्यासाठी उत्तर व दक्षिणेकडून पायऱ्या आहेत भग्न मंडपाचे हेच अवशेष शिल्लक आहेत
मंडपाचे पुढे उत्तर व दक्षिण बाजुस प्रत्येकी एक खोली काढलेला सोफा आहे या खोल्याचे दगडी कलाकुसरीने युक्त पुढे काढलेल्या दोन देवळ्या आहेत उत्तरे कडील देवळीत गणपती व दक्षिणे कडील देवळीत मारुती यांच्या प्रतिमा आहेत.
मधील सोप्याची तुळई दोन खांबांनी आधारलेली असुन गर्भगृहाचे दरवाजाचे वरील भागात दशावतार व उत्तरबाजुस कृष्ण गवळणी व दक्षिणबाजुस सूर्य याची शिल्पे आहेत. पूर्वाभिमुख दरवाज्यावर मुर्ती, वेलपत्ती काढलेल्या आहेत हे काम अतिशय सुबक आहे या काम मधील व्यक्ती रूपा वरून हे काम पेशवाई कालीन आहे असे दिसते.
गर्भगृहात प्रवेश केल्यावर समोर पश्चिमेस पूर्वाभिमुख तीखणी मेघदम्बरी असुन ती उंचावर आहे मध्यभागीचे मेघदम्बरी धातूची म्हाळसेसह घोड्यावर विराजमान खंडोबाची झालेली उत्सव मुर्ती आहे. या मुर्ती मागे एक शेंदूर चर्चित डोळे बसविलेला खंडोबाचा तांदळा आहे
गर्भगृहाचे नेरुत्य कोपऱ्यात एक अश्वारूढ शेंदूर चर्चित घोडेस्वार असुन त्याचे शेजारी सुमारे ८ फुट उंचीचा दुधारी खंडा आहे
गर्भगृहाचे वयाव कोपऱ्यात अश्वारूढ खंडोबा म्हाळसा यांची प्रतिमा आहे त्याचे पश्चिमबाजुस लिंग व तांदळे आहेत.
जुन्याकाळी खंडोबाचे वास्तव्य मंदिरामागे दिसणारे डोंगरावर होते, सातारे येथील जहागीरदार दर्शनासाठी तेथे रोज जात ते वृद्ध झाल्यावर त्यांचे भक्तीने देव या ठिकाणी गोकुळ अष्टमी चे दिवशी आले अशी जनश्रुती आहे.
मंदिराचा गाभारा बाहेरून तारकाकृती करण्यात आलेला आहे त्या वरील नक्षीकाम सुंदर आहे गर्भगृहास दक्षिण बाजूनेही दरवाजा आहे मंदिराचे काम जांभ्या दगडात करण्यात आलेले आहे.
मंदिराचे शिखर सुंदर असुन त्या वरील गिलावा गेलेला आहे. त्या मुळे त्या वरील मुर्ती काम कसे होते हे समजत नाही, हे मंदिर औरंगाबाद जवळील बोरसर येथील कुलकर्णी यांनी बांधल्याचे सांगतात तर ईस १७६६ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी यांचा जिर्णोधार केल्याचेही सागितले जाते. परंतु मंदिराचे अपूर्ण स्थिती मुळे बांधकाम अपूर्ण राहिले की उध्वस्त झाले हे समजत नाही.
मंदिराचे आवाराचे अग्न्येय कोपऱ्यात एक पार असुन त्यावर गणपती व मारुती यांच्या प्रतिमा आहेंत
दसरा नवरात्र, चंपाषष्टी षडरात्र , पौष पौर्णिमा, या दिवसा मध्ये येथे यात्रा भरते
————————————————————————