जेजुरीचे भौगोलिक स्थान, हवामान, यांची नकाशे आलेख छायाचित्र या द्वारे सचित्र माहिती जेजुरी परिसरातील जैवविविधता यांची सचित्र माहिती
जेजुरी भौगोलिक जेजुरी हवामान
जेजुरी जैवविविधता
जेजुरी वनस्पती जेजुरी फुले जेजुरी पक्षी जेजुरी सर्प जेजुरी वन्यजीव
जेजुरी पुण्यापासून रस्ता मार्गाने,पुणे-पंढरपूर मार्गावर ४७ किलोमीटर अंतरावर आहे.हे ठिकाण रस्ता मार्गाने सर्व बाजूंनी जोडलेले आहे. पुणे-कोल्हापूर लोहमार्गावर ३८ किलोमीटर अंतरावर जेजुरी रेल्वे स्टेशन आहे.कोणत्याही मार्गाने जेजुरी जवळ आले कि जेजुरीगडाचे दर्शन होते.
*
जेजुरीनगरी भारतामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्या मधील पुरंदर तालुक्यात १८°१६’३” उत्तर ७४°९’५१” पश्चिम वर समुद्रसपाटी पासून ७३४ मीटर उंचीवर वसलेली आहे.जेजुरी रेल्वे स्टेशन ६९२ मीटर हा कमी उंचीचा भाग असून जेजुरी गड ८०२ मीटर उंचीवर आहे , कडेपठार जेजुरीतील सर्वाधिक उंचीचा भाग असून तो ९९२ मीटर उंचीवर आहे,
भुगर्भीय रचना
जेजुरी दक्खनचे पठार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भूगोलिक भागात आहे . सुमारे ३५०० वर्ष अविरत आग ओकीत असणाऱ्या ज्वालामुखी पासून सुमारे ६५ दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेल्या अग्नीजन्य खडकाचा हा प्रदेश.
येथील डोंगर भूमी एक संघ नसून कठीण खडक, भूसभुशीत गेरू, मुरुम, ठिसूळ खडक यांच्या आलटून पालटून असणाऱ्या थरातून बनलेली आहे.
डोंगर माथ्याचा भाग खडकाळ स्वरूपाचा असून अनेक वर्षं होणारी डोंगराची धूप व पाण्याचे प्रवाहाचे खणन कार्य या मुळे डोंगर पायथ्याला गळ संचित जमीन तयार झालेले आहे.
*
हवामान
येथील हवामानाची तीन मोसमात होते उन्हाळ्याचा काळ कोरडा व उष्ण असतो, पावसाळ्याचा काळ उष्ण व आद्रतेच असतो टर हिवाळ्याचा काळ कोरडा व थंड असतो. सर्वाधिक तापमान मे महिन्यात ३८ अंश सेंटी. चे दरम्यान तर सर्वात कमी तापमान जानेवारी महिन्यात १३ अंश सेंटी. चे दरम्यान असते.
सर्वाधिक हवेतील आद्रता ऑगस्ट महिन्यात असते तर कमी आद्रता मार्च महिन्यात असते.
पर्जन्यमान
जेजुरी कमी पाऊसाचे प्रदेशात मोडते येथे सरासरी ४५० मिमी पाऊस पडतो, जून पाऊस पासून पाऊसकाळास सुरवात होते व तो ऑक्टोबर महिन्याचे शेवट पर्यंत असतो सर्वाधिक पाऊस सप्टेबर महिन्यात सुमारे ३७५ मिमी पर्यंत पडतो.
वायुमान
जेजुरी मध्ये सर्वाधिक वारा पश्चिमे कडून वाहतो तर कमी वारा ईशान्ये कडून वाहतो
लोकजीवन
लोकसंख्या
जेजुरीच्या लोकसंख्या वाढीचा विचार करता लोकसंखे मधील सर्वात कमी वाढ ईस १९४१ ते १९५१ चे दशकात दिसते, या दशकामध्ये रोजगारा साठी झालेले स्थलांतर व आलेल्या प्लेग चे साथीने कमी झालेली लोकसंख्या हे घटक कारणीभूत ठरल्याचे दिसतात
ईस १९८१ ते १९९१ चे दशकात लोकसंखेत मोठी वाढ दिसते. ईस १९९१ ते २००१ चे सर्वाधिक वाढ दिसते. ईस १९९३ चे दरम्यान जेजुरी मध्ये झालेल्या औधोगिक वसाहती मुळे जेजुरी मध्ये रोजगारा साठी आलेले स्थलांतरित व व्यवसाय आलेल्या स्थलांतराचा या वाढीवर झालेचे जाणवते
व्यवसाय
ईस १८५० ते १९०० चे दरम्यान जेजुरी मधील व्यवसायाचा मुळ स्रोत हा शेती व शेतमजुरी हाच असल्याचे दिसते. १९०० ते १९५० दरम्यान शेती व्यवसायात काही प्रमाणात घट झालेंचे दिसते. तर व्यापार व धार्मिक सेवा व्यवसायात थोडी वाढ झालेचे जाणवते व्यापार व धार्मिक सेवा व्यवसाय वर्षभर येणारे यात्रा व उत्सवा वर आधारित होता. व नोकरी व्यवसायाचे अस्तित्व दिसू लागले होते १९५० ते २००० चे दरम्यान एकून सरसरीत शेते व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट झाली व व्यापार व धार्मिक सेवा व्यवसायाने प्रमुख स्थान प्राप्त केले नोकरी व्यवसायात सुद्धा या कालावधीत वाढ झाली. वाढलेले पर्यटन व औधोगिक वसाहती मुळे निर्माण झालेला रोजगार त्यामुळे वाढलेली लोकसंख्या या मुळे जेजुरी एक बाजारपेठ म्हणून विकसित होऊ लागली यांचा परिणाम जाणवतो. हाच परिणाम कायम राहत २००० नंतर व्यापार व धार्मिक सेवा व्यवसाय प्रमुख स्थानावर व नोकरी व्यवसाय द्वितीय स्थानावर गेल्याचे दिसते. शंभर सव्वाशे वर्षात जेजुरीचे व्यावसायिक स्वरूप बदलून १९५० ते २००० चे उतरार्धात एक पर्यटन नगरी, बाजारपेठ, औधोगिक नगरी म्हणून जेजुरी विकसित होत असलेचे दिसते.
***********************************************************
*
जेजुरी जैवविविधता
जेजुरीचा परिसर हा नैसर्गिक विविधता लाभलेला कडे पठारचा उंच डोंगरमाथा जानाई दरा, कवड दरा, रमणा असा दरी खोऱ्याचा प्रदेश जेजुरी गडाची कडेपठाराला भिडणारी डोंगर रांग होळकर तलाव, पेशवे तलाव, व कर्हा नदीवरील मल्हार सागर हे जलाशय विस्तृत माळ, झाडी, शेती, लोकवस्ती यांनी व्यापलेला हा प्रदेश. विविध पशु, पक्षी, झाडे, वनस्पती फुले यांनी संपन्न असलेली ही भुमी या परिसरातील जैववैविधतेचा हा परिचय
*
जेजुरी परिसरातील वृक्ष, वनस्पती
वृक्ष व वनस्पती हा पर्यावरणातील महत्वपुर्ण घटक निसर्गातील सर्वच प्राणीमात्रांना अन्न व निवाराच नव्हे तर जीवनच देणारा. याची कृतज्ञता म्हणून आजही मानव अनेक वृक्षाची देवता म्हणून पुजा करतो. अनेक धार्मिक उत्सवात व पुजा मध्ये विविध वृक्षांची व वनस्पतीची पाने, फुले, फळे, यांना महत्वपुर्ण स्थान असते. यांच्या मधील काहीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मा मुळे त्यांचा उपयोग औषध उपचारासाठी केला जातो. जेजुरी परिसरात अनेक वृक्ष आणि वनस्पती आढळतात त्या मधील काहींचा हा परिचय
- लिंब
- बाभूळ
- आंबा
- बोर
- गोटभर
- जांभूळ
- आपटा
- कवट
- महाडूंग
- पिंपरणी
- चिंच
*
जेजुरी परिसरातील फुले
उन्हाळ्यात उजाड झालेले डोंगर, माळ जून महिन्यात पावसाच्या सरी कोसळू लागल्यावर हळू हळू हिरवेगार होऊ लागतात आणि या हिरवाईत विविध रंगांची आकाराची फुले डोलू लागतात. जुलै, ऑगष्ट, सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात जेजुरीच्या परिसरात फुलू लागतात विविध रंग, आकार, गंध असणारे हे पुष्प वैभव पुन्हा निसर्ग चक्रात विलुप्त होऊन जाते ते पुढील वर्षी कोसळणाऱ्या जलधारा मध्ये पुन्हा फुलण्या साठी अश्या या जयाद्री मधील पुष्प वैभवाची ही झलक
- विंचवी
- आग्या
- अंबाडा
- बेचका
- चिकटा
- चिल्लरवेल
- छोटा कल्प
- दुधाळी
- गुलाबी बाभूळ
- गुल्मास
- जारवड
- कन्हेर
- काराळे
- करवंद
- काटे रिंगणी
- कावळी
- खेनवट
- कोंबडा
- कोरपड.
- कुटकुटी
- लहान चिरायत
- लहान
- लहान कल्प
- लांडा कावळा
- म्हातारा
- निरगुडी
- पिवळा धोतरा
- पोपटी
- रान कोथमिर
- रानतीळ
- रुई
- सब्जा
- सदामंडी
- सांजवेल
- सराटा
- सोनकुसुम
- सोनतरवड
- सोनटिकली
- ताग
- टनटनी
- तुळस
- उन्हाळी
- वर्षाराणी
*
जेजुरी परिसरातील पक्षी
विविध गळ्यानी गाणारे पक्ष्यांचे सूर म्हणजे निसर्गाने गायलेले सप्तसूरच असे अनेक पक्षी जेजुरीचा हा परिसर आपल्या गुंजनाने आळवीत असतात. प्रत्येकाचा रंग, रूप, स्वर, सगळेच भिन्न. कोणाला विणीच्या हंगामात कंठ फुटतो तर काहींचा रंग बहरतो. काही स्थलांतरित पाहुणे म्हणून काही काळासाठी येथे वास्तव्यास येणारे तर काही मुळ निवासी. कोणी शाकाहारी तर कोणी मांसाहारी काहीतर दोन्ही खाणारे. जेजुरी परिसरात आढळनाऱ्या अनेक पक्ष्या मधील काहींचा हा परिचय
*
जेजुरी परिसरातील सर्प
साप हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो. याच भावनेने नागपंचमीला नाग पुजा ही केली जाते. सापांच्या विविध जाती आढळतात त्यातील काही विषारी तर काही बिनविषारी असतात त्यांचा वावर सर्वत्र असलातरी वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या वातावरणातच आढळतात. जेजुरी परिसरात ही सापांच्या अनेक जाती आढळतात. या मधील काही साप व सरपटनाऱ्या जीवांचा हा परिचय
- चापडा ( bamboo pit viper) रंग – पोपटी, पोटा खालचा भाग पिवळा , शरीरावर फिकट तपकिरी नक्षी, / लांबी – १ ते ३ फुट / अन्न – पक्षी , पाली, / प्रजनन – जून – जुलै वैशिष्टे – विषारी, झाडावर राहणारा, निशाचर, त्रिकोणी डोके, चिडल्यावर शेपूट जोरात हलवतो
- चित्रांग नायकूळ
- धामण ( indian rate snake ) रंग – काळा तपकिरी, मातकट पिवळा तांबडा अंगावर जाळीदार काळी नक्षी, तोंडाचे बाजूला ४ काळ्या रेष्या लांबी – ६ ते १० फुट / अन्न – बेडूक, उंदीर, कोंबडीची अंडी / प्रजनन – मार्च- मे वैशिष्टे – बिन विषारी, मोठा आवाज करून चावण्याचा प्रयत्न करते, झाडावर चढते, पाण्यात पोहते, अतिशय चपळ , महिन्याला किमान २० ते २५ उंदीर फस्त करते तया मुळे या सापास शेतकऱ्याचा मित्र म्हणतात
- धूळ नागीण ( banded race ) रंग – गव्हाणी गडद / फिकट तपकिरी / लांबी – ३ ते ४ फुट / अन्न – उंदीर, पाली, सरडे, / प्रजनन – फेब्रु- मे वैशिष्टे – बिन विषारी, चपळ, शरीरावर नागा सारखी नक्षी
- दिवड / विरुळा ( cheekered keel back watersnake ) रंग – शेवाळी, पिवळ्या काळ्या रंगा मध्ये पांढऱ्या पिवळ्या खवल्यांची एका आड एक रांग लांबी – २ ते ४ फुट / अन्न – मासे, बेडूक, डासांची अंडी / प्रजनन – डिसे- मार्च वैशिष्टे – बिन विषारी पण दंश दाहक, तापट स्वभाव. नदी विहिरी तळी ओढे येथे वास्तव्य
- डुरक्या घोणस ( sand boa ) रंग – मातकट तपकिरी, शरीरावर गडद तपकिरी धब्बे , शरीर दंड गोलाकार, / लांबी – २ ते २.५ फुट अन्न – उंदीर, पाली, बेडूक, सरडे, / प्रजनन – जुलै – ऑग वैशिष्टे – बिन विषारी, तापट स्वभाव, शेपटी कानस प्रमाणे खरखरीत
- फुरसे ( saw sealrd vipet ) रंग – फिकट तपकिरी, अंगावर जाळीदार नक्षी, डोक्यावर पांढऱ्या रंगाची बाणा प्रमाणे खून लांबी – ९ इंच ते ३ फुट / अन्न – सरडे, पाल, विंचू / प्रजनन – एप्रिल – ऑग वैशिष्टे – सर्वात लहान विषारी साप, चिडल्यावर शरीराचे वेटोळे करून शरीरा वरील खवले एकामेकावर घासून खस-खस आवाज करतो
- गवत्या ( green keelback / grass snake ) रंग – निस्तेज हिरवा, माने जवळ कधी पांढरे ठिपके अंगावर काळे आडवे पट्टे लांबी – १ ते ३ फुट / अन्न – बेडूक, पाली, / प्रजनन – मार्च – जून वैशिष्टे – बिन विषारी, शांत स्वभाव,
- घोणस ( rusell ‘s viper ) रंग – तपकिरी किवा पिवळसर, अंगावर भोवती पांढऱ्या काळ्या कडा असलेले काळे धब्बे , डोके त्रिकोणी चपटे, लांबी – ३ ते ६ फुट / अन्न – उंदीर, बेडूक, छोटे पक्षी / प्रजनन – मे – जुलै वैशिष्टे – विषारी , चिडल्यावर वेटोळे करून अंग फुगवून कुकरच्या शिटी सारखा आवाज काढतो , याचे दात सर्व विषारी सापा मध्ये मोठे आहेत
- हरण टोळ ( vine snake ) रंग – हिरवा सडपातळ, / लांबी – ३ ते ६ फुट / अन्न – पाल, पक्ष्यांची अंडी, छोटे पक्षी वैशिष्टे – निम विषारी, झाडावर राहणारा, शाईचे पेना प्रमाणे निमुळते तोंड , मानेवर काळी पांढरी नक्षी, अंगावर पांढऱ्या रेषा
- काळ तोंड्या / कृष्ण शीर्ष; ( dumerils black headed snake ) रंग – लालसर तपकिरी, लहान काळ्या ठिपक्यांची शरीरावर रांग लांबी – ६ इंच ते १८ इंच / अन्न – पाली, छोटे कीटक वैशिष्टे – बिन विषारी, गांडूळ सारखे शरीर मानेवर बदामी रंगाचे दोन ठिपके
- कवड्या ( common wolf snake ) रंग – लालसर तपकिरी, अंगावर पांढरे गोल पट्टे, तोंड बदमा सारखे / लांबी – १.५ ते २ फुट अन्न – पाली, बेडूक, उंदीर / प्रजनन – मार्च- मे वैशिष्टे – बिन विषारी, निशाचर, भिंतीवर २० फुट पर्यंत जाऊ शकतो
- खापर खवल्या ( phipson ‘s shieldtail ) रंग – जांभळा तपकिरी, पिवळे काळे ठिपके / लांबी – ६ ते १० इंच / अन्न – गांडूळ, छोटे जीव, कीटक वैशिष्टे – बिन विषारी , जमिनी खाली वास्तव्य, निशाचर, शेपटी जवळ अडवा पट्टा
- कुकरी ( banded kukari snake ) रंग – राखाडी तपकिरी लालसर, गडद तपकिरी रंगाचे आडवे ठिपके लांबी – १ ते ३ फुट / अन्न – उंदीर, पाली, अंडी, आळी / प्रजनन – नोव्हे – फेब्रु वैशिष्टे – बिनविषारी, निशाचर, डोक्यावर इंग्रजी V आकाराची खुण, शांत स्वभाव,
- मांडुळ ( earth boa ) रंग – लालसर तपकिरी, गोल शरीर, पोट काळपट तपकिरी / लांबी – २ ते ४ फुट / अन्न – उंदीर, सरडे / प्रजनन – जुलै – सप्टे वैशिष्टे – बिन विषारी, पावसाळ्यात सहज दिसणारा, तोंड व शेपूट दिसायला सारखेच, शांत प्रवृत्ती,
- मांजर्या ( common cat snake ) रंग – फिकट तपकिरी, शरीरावर तपकिरी नागमोडी खुणा / लांबी – २ ते ४ फुट / अन्न – पाल,पक्षी, उंदीर वैशिष्टे – निम विषारी , झाडावर राहणारा, डोक्यावर इंग्रजी Y आकाराची खुण
- नाग (spectacled cobra ) रंग – गव्हाणी, राखाडी काळसर, तपकिरी पिवळसर / लांबी – ३ ते ५.५ फुट / अन्न – साप, उंदीर, बेडूक, पाली, कोंबडीची अंडी व पिले प्रजनन – मे – जून / वैशिष्टे – विषारी , फणा काढतो , हिस हिस आवाज करतो
- तस्कर ( common trinket snake ) रंग – शेवाळी तपकिरी, फिकट आडवे काळे पांढरे चट्टे , मानेवर गडद काळ्या रेषा / लांबी – २ ते ४ फुट अन्न – उंदीर, पाली, अंडी वैशिष्टे – बिन विषारी, चिडल्यावर इंग्रजी S प्रमाणे शरीराचा आकार करून चावण्याचा प्रयत्न करतो, अतिशय देखणा साप.
- वाळा ( worm snake ) रंग – तपकिरी लालसर, गांडूळ प्रमाणे दिसतो, / लांबी – १ ते २ फुट / अन्न – मुंग्या, वाळवी, कीटकांची अंडी वैशिष्टे – बिन विषारी, जमिनी खाली वास्तव्य, डोळे लहान
*
जेजुरी परिसरातील वन्य प्राणी
जेजुरी परिसरातील कडेपठार, जानाई दरा, कवड दरा, जांभळ दरा हा काहीसा झाडी असणारा डोंगरी परिसर या मध्ये काही वन्यप्राणी जीवनही आढळते शाकाहारी प्राण्या पासुन त्यांच्यावर गुजराण करणाऱ्या हिंस्रश्वापदांचा वावरही या परिसरात आहे. सन १९६० च्या दशका पर्यंत अगदी जेजुरी गडाचे पायथ्या पर्यंत वाघाचा वावर असल्याचे लोक सांगतात. आजही या यातील अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अश्याच काही वन्यजीवांचा हा परिचय