जेजुरीचे भौगोलिक स्थान, हवामान, यांची नकाशे आलेख छायाचित्र या द्वारे सचित्र माहिती जेजुरी परिसरातील जैवविविधता यांची सचित्र माहिती
जेजुरी भौगोलिक जेजुरी हवामान
जेजुरी जैवविविधता
जेजुरी वनस्पती जेजुरी फुले जेजुरी पक्षी जेजुरी सर्प जेजुरी वन्यजीव
जेजुरी पुण्यापासून रस्ता मार्गाने,पुणे-पंढरपूर मार्गावर ४७ किलोमीटर अंतरावर आहे.हे ठिकाण रस्ता मार्गाने सर्व बाजूंनी जोडलेले आहे. पुणे-कोल्हापूर लोहमार्गावर ३८ किलोमीटर अंतरावर जेजुरी रेल्वे स्टेशन आहे.कोणत्याही मार्गाने जेजुरी जवळ आले कि जेजुरीगडाचे दर्शन होते.
*
जेजुरीनगरी भारतामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्या मधील पुरंदर तालुक्यात १८°१६’३” उत्तर ७४°९’५१” पश्चिम वर समुद्रसपाटी पासून ७३४ मीटर उंचीवर वसलेली आहे.जेजुरी रेल्वे स्टेशन ६९२ मीटर हा कमी उंचीचा भाग असून जेजुरी गड ८०२ मीटर उंचीवर आहे , कडेपठार जेजुरीतील सर्वाधिक उंचीचा भाग असून तो ९९२ मीटर उंचीवर आहे,
भुगर्भीय रचना
जेजुरी दक्खनचे पठार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भूगोलिक भागात आहे . सुमारे ३५०० वर्ष अविरत आग ओकीत असणाऱ्या ज्वालामुखी पासून सुमारे ६५ दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेल्या अग्नीजन्य खडकाचा हा प्रदेश.
येथील डोंगर भूमी एक संघ नसून कठीण खडक, भूसभुशीत गेरू, मुरुम, ठिसूळ खडक यांच्या आलटून पालटून असणाऱ्या थरातून बनलेली आहे.
डोंगर माथ्याचा भाग खडकाळ स्वरूपाचा असून अनेक वर्षं होणारी डोंगराची धूप व पाण्याचे प्रवाहाचे खणन कार्य या मुळे डोंगर पायथ्याला गळ संचित जमीन तयार झालेले आहे.
*
हवामान
येथील हवामानाची तीन मोसमात होते उन्हाळ्याचा काळ कोरडा व उष्ण असतो, पावसाळ्याचा काळ उष्ण व आद्रतेच असतो टर हिवाळ्याचा काळ कोरडा व थंड असतो. सर्वाधिक तापमान मे महिन्यात ३८ अंश सेंटी. चे दरम्यान तर सर्वात कमी तापमान जानेवारी महिन्यात १३ अंश सेंटी. चे दरम्यान असते.
सर्वाधिक हवेतील आद्रता ऑगस्ट महिन्यात असते तर कमी आद्रता मार्च महिन्यात असते.
पर्जन्यमान
जेजुरी कमी पाऊसाचे प्रदेशात मोडते येथे सरासरी ४५० मिमी पाऊस पडतो, जून पाऊस पासून पाऊसकाळास सुरवात होते व तो ऑक्टोबर महिन्याचे शेवट पर्यंत असतो सर्वाधिक पाऊस सप्टेबर महिन्यात सुमारे ३७५ मिमी पर्यंत पडतो.
वायुमान
जेजुरी मध्ये सर्वाधिक वारा पश्चिमे कडून वाहतो तर कमी वारा ईशान्ये कडून वाहतो
लोकजीवन
लोकसंख्या
जेजुरीच्या लोकसंख्या वाढीचा विचार करता लोकसंखे मधील सर्वात कमी वाढ ईस १९४१ ते १९५१ चे दशकात दिसते, या दशकामध्ये रोजगारा साठी झालेले स्थलांतर व आलेल्या प्लेग चे साथीने कमी झालेली लोकसंख्या हे घटक कारणीभूत ठरल्याचे दिसतात
ईस १९८१ ते १९९१ चे दशकात लोकसंखेत मोठी वाढ दिसते. ईस १९९१ ते २००१ चे सर्वाधिक वाढ दिसते. ईस १९९३ चे दरम्यान जेजुरी मध्ये झालेल्या औधोगिक वसाहती मुळे जेजुरी मध्ये रोजगारा साठी आलेले स्थलांतरित व व्यवसाय आलेल्या स्थलांतराचा या वाढीवर झालेचे जाणवते
व्यवसाय
ईस १८५० ते १९०० चे दरम्यान जेजुरी मधील व्यवसायाचा मुळ स्रोत हा शेती व शेतमजुरी हाच असल्याचे दिसते. १९०० ते १९५० दरम्यान शेती व्यवसायात काही प्रमाणात घट झालेंचे दिसते. तर व्यापार व धार्मिक सेवा व्यवसायात थोडी वाढ झालेचे जाणवते व्यापार व धार्मिक सेवा व्यवसाय वर्षभर येणारे यात्रा व उत्सवा वर आधारित होता. व नोकरी व्यवसायाचे अस्तित्व दिसू लागले होते १९५० ते २००० चे दरम्यान एकून सरसरीत शेते व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट झाली व व्यापार व धार्मिक सेवा व्यवसायाने प्रमुख स्थान प्राप्त केले नोकरी व्यवसायात सुद्धा या कालावधीत वाढ झाली. वाढलेले पर्यटन व औधोगिक वसाहती मुळे निर्माण झालेला रोजगार त्यामुळे वाढलेली लोकसंख्या या मुळे जेजुरी एक बाजारपेठ म्हणून विकसित होऊ लागली यांचा परिणाम जाणवतो. हाच परिणाम कायम राहत २००० नंतर व्यापार व धार्मिक सेवा व्यवसाय प्रमुख स्थानावर व नोकरी व्यवसाय द्वितीय स्थानावर गेल्याचे दिसते. शंभर सव्वाशे वर्षात जेजुरीचे व्यावसायिक स्वरूप बदलून १९५० ते २००० चे उतरार्धात एक पर्यटन नगरी, बाजारपेठ, औधोगिक नगरी म्हणून जेजुरी विकसित होत असलेचे दिसते.
***********************************************************
*
जेजुरी जैवविविधता
जेजुरीचा परिसर हा नैसर्गिक विविधता लाभलेला कडे पठारचा उंच डोंगरमाथा जानाई दरा, कवड दरा, रमणा असा दरी खोऱ्याचा प्रदेश जेजुरी गडाची कडेपठाराला भिडणारी डोंगर रांग होळकर तलाव, पेशवे तलाव, व कर्हा नदीवरील मल्हार सागर हे जलाशय विस्तृत माळ, झाडी, शेती, लोकवस्ती यांनी व्यापलेला हा प्रदेश. विविध पशु, पक्षी, झाडे, वनस्पती फुले यांनी संपन्न असलेली ही भुमी या परिसरातील जैववैविधतेचा हा परिचय
*
जेजुरी परिसरातील वृक्ष, वनस्पती
वृक्ष व वनस्पती हा पर्यावरणातील महत्वपुर्ण घटक निसर्गातील सर्वच प्राणीमात्रांना अन्न व निवाराच नव्हे तर जीवनच देणारा. याची कृतज्ञता म्हणून आजही मानव अनेक वृक्षाची देवता म्हणून पुजा करतो. अनेक धार्मिक उत्सवात व पुजा मध्ये विविध वृक्षांची व वनस्पतीची पाने, फुले, फळे, यांना महत्वपुर्ण स्थान असते. यांच्या मधील काहीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मा मुळे त्यांचा उपयोग औषध उपचारासाठी केला जातो. जेजुरी परिसरात अनेक वृक्ष आणि वनस्पती आढळतात त्या मधील काहींचा हा परिचय
*
जेजुरी परिसरातील फुले
उन्हाळ्यात उजाड झालेले डोंगर, माळ जून महिन्यात पावसाच्या सरी कोसळू लागल्यावर हळू हळू हिरवेगार होऊ लागतात आणि या हिरवाईत विविध रंगांची आकाराची फुले डोलू लागतात. जुलै, ऑगष्ट, सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात जेजुरीच्या परिसरात फुलू लागतात विविध रंग, आकार, गंध असणारे हे पुष्प वैभव पुन्हा निसर्ग चक्रात विलुप्त होऊन जाते ते पुढील वर्षी कोसळणाऱ्या जलधारा मध्ये पुन्हा फुलण्या साठी अश्या या जयाद्री मधील पुष्प वैभवाची ही झलक
*
जेजुरी परिसरातील पक्षी
विविध गळ्यानी गाणारे पक्ष्यांचे सूर म्हणजे निसर्गाने गायलेले सप्तसूरच असे अनेक पक्षी जेजुरीचा हा परिसर आपल्या गुंजनाने आळवीत असतात. प्रत्येकाचा रंग, रूप, स्वर, सगळेच भिन्न. कोणाला विणीच्या हंगामात कंठ फुटतो तर काहींचा रंग बहरतो. काही स्थलांतरित पाहुणे म्हणून काही काळासाठी येथे वास्तव्यास येणारे तर काही मुळ निवासी. कोणी शाकाहारी तर कोणी मांसाहारी काहीतर दोन्ही खाणारे. जेजुरी परिसरात आढळनाऱ्या अनेक पक्ष्या मधील काहींचा हा परिचय
*
जेजुरी परिसरातील सर्प
साप हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो. याच भावनेने नागपंचमीला नाग पुजा ही केली जाते. सापांच्या विविध जाती आढळतात त्यातील काही विषारी तर काही बिनविषारी असतात त्यांचा वावर सर्वत्र असलातरी वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या वातावरणातच आढळतात. जेजुरी परिसरात ही सापांच्या अनेक जाती आढळतात. या मधील काही साप व सरपटनाऱ्या जीवांचा हा परिचय
*
जेजुरी परिसरातील वन्य प्राणी
जेजुरी परिसरातील कडेपठार, जानाई दरा, कवड दरा, जांभळ दरा हा काहीसा झाडी असणारा डोंगरी परिसर या मध्ये काही वन्यप्राणी जीवनही आढळते शाकाहारी प्राण्या पासुन त्यांच्यावर गुजराण करणाऱ्या हिंस्रश्वापदांचा वावरही या परिसरात आहे. सन १९६० च्या दशका पर्यंत अगदी जेजुरी गडाचे पायथ्या पर्यंत वाघाचा वावर असल्याचे लोक सांगतात. आजही या यातील अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अश्याच काही वन्यजीवांचा हा परिचय